TRENDING:

Stock Market Holiday: 4 मार्चला होळीमुळे स्टॉक मार्केट बंद राहणार की सुरू? BSE-NSE ने दिली अपडेट

Last Updated:
होळीच्या निमित्ताने शेअर बाजार ३ मार्चला बंद होता. आज ४ मार्च रोजी बाजार नेहमीप्रमाणे सुरू राहील. २०२६ मध्ये शेअर बाजार १५ दिवस बंद राहणार आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत.
advertisement
1/6
4 मार्चला होळीमुळे स्टॉक मार्केट बंद राहणार की सुरू? BSE-NSE ने दिली अपडेट
आज ४ मार्च, देशभरात होळीचा उत्साह असला तरी शेअर बाजारात मात्र आज व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. अनेक गुंतवणूकदारांच्या मनात आज सुट्टी आहे का? असा प्रश्न होता, मात्र नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अधिकृत कॅलेंडरनुसार, होळीनिमित्तची सुट्टी कधी दिली याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
advertisement
2/6
शेअर बाजार हा आधीच जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार चालतो. जरी वेगवेगळ्या राज्यांमध्ये होळी वेगवेगळ्या तारखांना साजरी होत असली, तरी एक्सचेंजने केवळ ३ मार्चलाच अधिकृत सुट्टी ठेवली होती. त्यामुळे आज इक्विटी, डेरिव्हेटिव्ह आणि करन्सी या सर्व सेगमेंटमध्ये ट्रेडिंग सुरू राहील.
advertisement
3/6
होळीनिमित्ताने सुट्टी मंगळवारी, ३ मार्च रोजी देण्यात आली होती. त्यामुळे आज बुधवार, ४ मार्च रोजी बाजार सामान्यपणे सुरू राहील.२०२६ मध्ये शेअर बाजार एकूण १५ दिवस बंद राहणार आहे. 26 मार्च रोजी देखील राम नवमी निमित्ताने शेअर मार्केट बंद राहील.
advertisement
4/6
याशिवाय शनिवार रविवार शेअर मार्केट बंद असतं. 31 मार्च रोजी महावीर जयंती निमित्ताने शेअर मार्केट बंद राहणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यातील सुट्ट्याचा विचार केला तर ३ एप्रिल गुड फ्रायडे, १४ एप्रिल डॉ. आंबेडकर जयंती, १ मे महाराष्ट्र दिन, २८ मे बकरी ईदनिमित्ताने सुट्टी जाहीर केली आहे.
advertisement
5/6
शेअर बाजारात सध्या मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोमवारी बाजार १ टक्क्यांहून अधिक घसरला होता. ऑटो, रिअल्टी आणि एनर्जी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी कमजोरी दिसून आली. मिडिल ईस्ट मधील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. तेल महाग झाल्यामुळे महागाई वाढण्याचा धोका असतो, ज्याचा थेट परिणाम बाजारावर होतो.
advertisement
6/6
मार्केट तज्ज्ञांच्या मते, निफ्टी सध्या २४,६०० च्या महत्त्वाच्या पातळीवर आहे. जर ही पातळी तुटली तर घसरण आणखी वाढू शकते. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सावध राहून आणि जोखीम ओळखूनच गुंतवणूक करावी, असा सल्ला दिला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Stock Market Holiday: 4 मार्चला होळीमुळे स्टॉक मार्केट बंद राहणार की सुरू? BSE-NSE ने दिली अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल