TRENDING:

Share Market Today: शेअर बाजार धडामधूम! सेन्सेक्स 1097 अंकांनी घसरला, पाहा 5 कारणं

Last Updated:
Share Market Crash: भारतीय शेअर बाजार शुक्रवारी म्हणजेच 6 मार्च रोजी मोठ्या घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 1097 अंकांनी घसरुन बंद झाला. तर निफ्टी घसरणीसह 24,500 च्या घाली आली. चला जाणून घेऊया शेअर बाजारातील आजच्या घसरणीमागची 5 कारणं...
advertisement
1/8
Share Market Today:शेअर बाजार धडामधूम! सेन्सेक्स 1097अंकांनी घसरला, पाहा 5 कारणं
Share Market Crash: भारतीय शेअर बाजारात एका दिवसाच्या दिलास्यानंतर शुक्रवारी (6 मार्च) रोजी मोठी घसरण पाहायला मिळाली. व्यवहाराच्या अखेरीस 30 शेअर्सचा बीएसईचा सेन्सेक्स 1,097 अंकांनी किंवा 1.37% च्या घसरणीसह 78,918.90 च्या लेव्हलवर बंद झाला. तर 50 शेअर्सचा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 315.45 अंक किंवा 1.27% घसरुण 24,450.45 च्या लेव्हलवर बंद झाला.
advertisement
2/8
निफ्टीमध्ये सामिल कंपन्यांमध्ये आयसीआयसीआय बँक, इंटरनल, श्रीराम फायनेन्स, अॅक्सीस बँक आणि अल्ट्राटेक सीमेंट टॉप लूझर राहिले. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स, रियालन्स इंडस्ट्रीज, इनटीपीसी, ओएसजीसी आणि सनफार्मा टॉप गेनर्स राहिले.शेअर बाजारात भुकंप का आला? जाणून घ्या 5 कारणं...
advertisement
3/8
वाढता भू-राजकीय तणाव : अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या संघर्षामुळे ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला तर कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात अशी भीती आहे. यामुळे महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेत बिघाड होण्याचा धोका वाढला आहे.
advertisement
4/8
कमकुवत जागतिक संकेत : कमकुवत जागतिक संकेतांचा भारतीय शेअर बाजारावरही परिणाम झाला. आशियाई बाजारांमध्ये घसरण झाली, दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 1% पेक्षा जास्त घसरला. गुरुवारी अमेरिकन शेअर बाजारही घसरणीसह बंद झाले.
advertisement
5/8
FII ची सलग विक्री : फॉरेन इंस्टीट्यूशन इन्वेस्टर्स (FIIs) भारतीय बाजारातून सलग पैसा काढत आहेत. गुरुवारी त्यांनी जवळपास 3,752.52 कोटी रुपयांचे शेअर विकले होते. मार्च महिन्यात आतापर्यंत एफआयआय जवळपास 16,000 कोटी रुपयांची विक्री केली आहे. ज्यामुळे बाजारावर दबाव कायम आहे.
advertisement
6/8
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती : ब्रेंट कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली तीव्र वाढ देखील बाजारातील चिंता वाढवत आहे. गुरुवारी, किंमत जवळजवळ 5% वाढून 86.28 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली, जी जवळजवळ 20 महिन्यांतील उच्चांक होती. तसंच, शुक्रवारी सकाळी ती 84.4 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास व्यवहार करत होती.
advertisement
7/8
बँकिंग शेअर्समध्ये मोठी विक्री : बँकिंग सेक्टरच्या शेअर्समध्येही दबाव स्पष्ट दिसतोय. व्यवहारादरम्यान बँक निफ्टी जवळपास 1% पर्यंत खाली आलाय. सोबतच निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्सही 1% हून जास्त खाली आला आहे. एक्सपर्ट्सनुसार, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींने आर्थिक दबावाच्या शक्यतेच्या कारणामुळे बँकिंग शेअरर्समधील विक्री वाढली आहे.
advertisement
8/8
मार्चमध्ये हिरव्या निशाणावर बंद झाला होता बाजार : भारतीय शेअर बाजार गुरुवारी (5 मार्च) च्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिरव्या रंगावर बंद झाला होता. सेन्सेक्स 899.71 अंक किंवा 1.14 टक्के तेजीसह 80,015.90 आणि निफ्टी 285.40 अंक किंवा 1.17 टक्के वाढीसह 24,765.90 वर बंद झाला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Share Market Today: शेअर बाजार धडामधूम! सेन्सेक्स 1097 अंकांनी घसरला, पाहा 5 कारणं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल