सीझफायर झालं आणि 8 कंपन्यांचे शेअर्स रॉकेटसारखे धावले, 120 मिनिटांत Market मध्ये काय घडलं?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अमेरिका इराण युद्धविरामामुळे भारतीय शेअर बाजारात बंपर तेजी, सेन्सेक्स ७७२९० पार २७०० अंक उडी, निफ्टी २३९३८ वर, इंडिगो एलअँडटी बजाज फायनान्स अदानी पोर्ट्स जोरात.
advertisement
1/6

गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध आणि महागाईच्या सावटाखाली दबलेल्या शेअर बाजाराने आज अखेर मोकळा श्वास घेतला. अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविरामची घोषणा करताच, त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात बंपर तेजीच्या रूपाने पाहायला मिळाले.
advertisement
2/6
बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीने ऐतिहासिक झेप घेत गुंतवणूकदारांना मालामाल केले. बुधवारी सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७७,२९० च्या पातळीवर पोहोचला. अवघ्या काही सेकंदात सेन्सेक्सने २७०० अंकांनी वधारल्याचं पाहायला मिळालं.
advertisement
3/6
नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी देखील मागे राहिला नाही. निफ्टीने ८०० अंकांनी वधारला. २३,९३८ अंकांवर पोहोचली. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सलग घरसण सुरू होती. युद्धाची टांगती तलवार तूर्तास बाजूला झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर प्रॉफिट बुकिंगचे पैसेही मार्केटमधून काढले जात आहेत.
advertisement
4/6
बाजारातील या 'बुल्स'च्या वर्चस्वामुळे जवळजवळ सर्वच क्षेत्रांतील शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. IndiGo: १०% वाढ , L&T: ८% वाढ, Bajaj Finance & Adani Ports: ७% वाढ, बँकिंग सेक्टर: HDFC बँक (४.८०%), SBI (४%), ICICI बँक (४%) या शेअर्समध्येही मोठी खरेदी झाली.
advertisement
5/6
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांतील तणावामुळे जागतिक बाजारात चिंतेचे वातावरण होते. मात्र, आता दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती झाल्याने बाजाराचा 'सेंटीमेंट' बदलला असून गुंतवणूकदारांनी पुन्हा बाजारात पैसा ओतण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
6/6
युद्ध थांबल्यामुळे पुरवठा साखळीतील अडथळे दूर झाले असून कच्च्या तेलाच्या किमती अचानक कोसळल्या आहेत. भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशासाठी ही मोठी सकारात्मक बातमी ठरली, ज्याचा थेट फायदा शेअर बाजाराला झाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/Share Market/
सीझफायर झालं आणि 8 कंपन्यांचे शेअर्स रॉकेटसारखे धावले, 120 मिनिटांत Market मध्ये काय घडलं?