TRENDING:

Success Story : कोणताही 'धंदा' छोटा नसतो! IT ची नोकरी सोडली, आता दिवसाला विकताय 500 वडापाव, महिन्याला 200000 कमाई

Last Updated:
चार वर्षे आयटी क्षेत्रात काम करून आणि 50 हजारांहून अधिक पगार असलेली नोकरी सोडून त्यांनी पुण्यात कर्वेनगर भागात वडापावचा व्यवसाय सुरू केला आहे.
advertisement
1/5
IT ची नोकरी सोडली, आता दिवसाला विकताय 500 वडापाव, महिन्याला 200000 कमाई
अनेक तरुण नोकरी सोडून व्यवसायाकडे वळत आहेत. धुळे जिल्ह्यातील शेखर देवरे यांनी आयटीतील नोकरी सोडून व्यवसायाचा मार्ग निवडला आहे. चार वर्षे आयटी क्षेत्रात काम करून आणि 50 हजारांहून अधिक पगार असलेली नोकरी सोडून त्यांनी पुण्यात कर्वेनगर भागात वडापावचा व्यवसाय सुरू केला आहे.
advertisement
2/5
शेखर यांना नेहमी वाटत होतं स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा. त्यामुळे त्यांनी एक वर्षभर विविध व्यवसायांवर संशोधन केलं. बाजारपेठ समजून घेतली आणि शेवटी त्यांनी महाराष्ट्राच्या पारंपरिक खाद्यपदार्थावर विश्वास ठेवत वडापाव व्यवसायाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
3/5
सुरुवातीला शेखर यांनी फ्रँचायजी मॉडेलचा अभ्यास करून त्याआधारे कर्वेनगरमध्ये व्यवसाय सुरू केला. त्यांचा हा व्यवसाय चांगलाच लोकप्रिय ठरला आहे. वड्यांसोबत दिला जाणारा ठेचा आणि चिंच-गुळाची चटणी ही ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्यांच्या वडापावची किंमत 20 रुपये असून, दिवसाला सुमारे 400 ते 500 वडे विकले जात आहेत. यामधून महिन्याकाठी 2 लाखांपेक्षा अधिक कमाई ते करत आहेत.
advertisement
4/5
शेखर सांगतात की, सुरुवातीला भीती वाटत होती की आपल्याला हे जमेल का? पण मी ठरवलं होतं की मेहनत करून व्यवसाय उभा करायचा. आयटीमधील अनुभवाचा वापर मी व्यवस्थापनात आणि मार्केटिंगमध्ये करत आहे. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून आत्मविश्वास वाढतो आहे.
advertisement
5/5
शेखर यांनी धाडस, चिकाटी आणि चांगला दृष्टिकोन ठेवत व्यवसाय यशस्वी केला आहे. पैशाच्या मागे न धावता, स्वतःच्या आवडीत आणि कल्पनेतूनच मोठं काहीतरी घडवता येतं, अशा भावना शेखर यांनी व्यक्त केल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Success Story : कोणताही 'धंदा' छोटा नसतो! IT ची नोकरी सोडली, आता दिवसाला विकताय 500 वडापाव, महिन्याला 200000 कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल