TRENDING:

Success Story: फूड व्हॅन घेऊन पैसे कमावायचे? जालन्याचा सुनील महिन्याला कमावतो 60 हजार, फक्त या चुका टाळल्या!

Last Updated:
नोकरी सोडून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी जालना शहरातील सुनील पद्माकर मिसाळ या तरुणाने फूड व्हॅनच्या माध्यमातून स्वयंरोजगार निवडला आहे. त्याच्या फूड व्हॅनवर मिळणाऱ्या रगडा, भेळ, चाट भंडार, बासुंदी चहाला ग्राहकांची पसंती मिळत आहे.
advertisement
1/7
फूड व्हॅन घेऊन पैसे कमावायचे? सुनील महिन्याला कमावतो 60 हजार, या चुका टाळल्या!
ऑटोमोबाईल इंजिनिअरची नोकरी सोडून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी जालना शहरातील सुनील पद्माकर मिसाळ या तरुणाने फूड व्हॅनच्या माध्यमातून स्वयंरोजगार निवडला आहे. त्याच्या फूड व्हॅनवर मिळणाऱ्या रगडा, भेळ, चाट भंडार, बासुंदी चहाला ग्राहकांची पसंती मिळत आहे.
advertisement
2/7
सुनील मिसाळ याने ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची पदवी संपादन करून 8 वर्षे जालना शहरातील दुचाकीच्या शोरूममध्ये सर्व्हिस इंजिनिअर म्हणून काम केले. स्वतःच्या पायावर उभे राहून काहीतरी करून दाखवण्याची जिद्द बाळगून त्याने नवीन काहीतरी उद्योग उभारण्याचा निश्चय केला.
advertisement
3/7
कामानिमित्त पुणे, मुंबई येथे जावे लागत असल्याने त्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या फूड व्हॅन बघितल्या. जालना शहरातही ही फूड व्हॅन सुरू करण्याचा निर्णय त्याने घेतला. यासाठी एक वाहन कर्जावर घेतले. जमा केलेल्या पैशातून या वाहनाला फूड व्हॅन बनवून तिला सजवले. ही व्हॅन इको फ्रेंडली आहे. सौर ऊर्जा यंत्रणा या व्हॅनमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे.
advertisement
4/7
मिसाळ याने ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. जालना शहरातील मोतीबाग जवळ असलेल्या जुन्या विश्रामगृहासमोर सुनील मिसाळ याने यश फूड्स नावाने आपला व्यवसाय सुरू केला आहे. ही व्हॅन ग्राहकांचे लक्ष वेधून घेते. भेळ, रगडा, पॅटीस, मिसळ समोसा, चाट भंडार आदी ताजे पदार्थ आपण स्वतः तयार करून ते ग्राहकांना देतो.
advertisement
5/7
चवदार पदार्थ असल्याने ग्राहक गर्दी करीत असल्याचे सुनील मिसाळ याने सांगितले. मुंबई-पुण्याच्या पदार्थांची चव आपल्या फूड व्हॅनवर उपलब्ध असल्याचे तो सांगतो. मराठवाड्यातील पहिली फूड व्हॅन आपण तयार केली असल्याचे त्याने सांगितले.
advertisement
6/7
शिक्षण घेत असताना टेक्निकल इव्हेंटसाठी राष्ट्रीय स्तरावर दोन पुरस्कारही पटकावले आहेत. आजमितीस सरकारी नोकरीच्या संधी संपल्यात जमा आहेत. त्यामुळे अनेक पदवीधर तरुण कमी पगारावर खासगी कंपनीत काम करत आहेत. तरुणांनी यापुढे नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वयंरोजगार निवडला पाहिजे. त्यातूनच आपले आणि परिवाराचे कल्याण निश्चित होईल, अशी भावना सुनील मिसाळ याने व्यक्त केली आहे.
advertisement
7/7
या व्यवसायाच्या माध्यमातून दिवसाला 4 ते 5 हजाराचे कलेक्शन होते. त्यातून 2 ते अडीच हजार निव्वळ नफा मिळतो. महिन्याकाठी 60 हजार रुपयांचा निव्वळ नफा राहत असल्याचे मिसाळ याने लोकल 18 शी बोलताना सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Success Story: फूड व्हॅन घेऊन पैसे कमावायचे? जालन्याचा सुनील महिन्याला कमावतो 60 हजार, फक्त या चुका टाळल्या!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल