TRENDING:

Success Story : पारंपरिक दगडी वस्तूंना दिलं नवं रूप, नोकरी सोडून केलेला व्यवसाय यशस्वी, वर्षाला 6 लाख कमाई

Last Updated:
वृषाली गायकवाड यांना नेहमीच जुन्या गोष्टींचं जतन आणि परंपरेशी नातं ठेवणं महत्त्वाचं वाटायचं.याच कल्पनेतून त्यांनी व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं.
advertisement
1/7
पारंपरिक वस्तूंना दिलं नवं रूप, नोकरी सोडून केलेला व्यवसाय यशस्वी, 6 लाख कमाई
पारंपरिक दगडी वस्तूंना नवं रूप देत त्यांना नवसंजीवनी देण्याचं काम पुण्यातील कात्रज-आंबेगाव परिसरातील वृषाली गायकवाड या गृहिणीने केलं आहे. M.Com. पर्यंत शिक्षण पूर्ण करून काही काळ नोकरी केल्यानंतर त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत घरातूनच व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. 2020 मध्ये सुरू झालेला हा व्यवसाय आज भारतभर पोहोचला असून, त्यातून त्या दरवर्षी सुमारे सहा लाख रुपयांचं उत्पन्न मिळवतात.
advertisement
2/7
वृषाली गायकवाड यांना नेहमीच जुन्या गोष्टींचं जतन आणि परंपरेशी नातं ठेवणं महत्त्वाचं वाटायचं. एक दिवस घरातील जुन्या वस्तू जसे की पाटा, वरवंटा, खलबत्ता, जातं याकडे पाहत असताना त्यांच्या मनात विचार आला.
advertisement
3/7
या वस्तूंना जर नवं रूप दिलं तर त्या केवळ उपयोगीच नाही, तर घराच्या सजावटीसाठीसुद्धा वापरता येतील. याच कल्पनेतून त्यांनी व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं.
advertisement
4/7
या व्यवसायाची सुरुवात अगदी छोट्या प्रमाणावर झाली. त्यांनी काही जुन्या दगडी वस्तू संकलित करून त्यांचं नवं डिझाइन तयार केलं आणि स्थानिक कारागिरांकडून त्या वस्तू तयार करून घेतल्या. सुरुवातीला केवळ पाटा-वरवंटा विक्रीस ठेवले होते. हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद वाढू लागला आणि त्यांनी वस्तूंच्या प्रकारात भर घालायला सुरुवात केली.
advertisement
5/7
सध्या त्यांच्या विक्रीत 25 प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये लहान मुलींसाठी भातुकलीचा सेट, विविध साइजमधील जातं, खलबत्ता, देवळीसाठी दगडी तुळस, देवघर, दीपमाळ यांचा समावेश आहे. या वस्तू 300 रुपयांपासून सुरू होऊन 8,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत उपलब्ध आहेत. सगळ्यात विशेष बाब म्हणजे या सर्व वस्तू त्या स्वतः डिझाईन करतात आणि कुशल कारागिरांच्या मदतीने बनवून घेतात.
advertisement
6/7
वृषाली यांचा व्यवसाय मुख्यतः ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चालतो. सोशल मीडियाच्या मदतीने त्यांनी आपला ब्रँड तयार केला असून, आज त्यांचे ग्राहक संपूर्ण भारतभर आहेत. पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिकसह दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद आणि कोलकाता या शहरांतून मोठ्या प्रमाणात मागण्या येतात.
advertisement
7/7
वृषाली गायकवाड यांच्या यशाची गोष्ट अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी नोकरी सोडून, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत पारंपरिक वस्तूंना नवसंजीवनी दिली. त्यांनी फक्त व्यवसाय केला नाही तर परंपरेचा वारसाही पुढे नेला. आज त्यांच्या या कल्पकतेचं आणि मेहनतीचं फळ म्हणजे एक यशस्वी महिला उद्योजक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Success Story : पारंपरिक दगडी वस्तूंना दिलं नवं रूप, नोकरी सोडून केलेला व्यवसाय यशस्वी, वर्षाला 6 लाख कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल