Currency : डॉलरच्या तुलनेत जगातलं सगळ्यात कमजोर चलन कोणतं? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्हाला माहीत आहे का, जगात असे काही देश आहेत जिथे 1 डॉलर खरेदी करण्यासाठी तेथील लोकांना चक्क हजारो नोटांची थप्पी घेऊन जावी लागते. त्या देशांच्या तुलनेत आपला रुपया आजही खूप ताठ मानेने उभा आहे. चला तर मग, जगातील सर्वात 'कंगाल' चलनं कोणते आणि त्या शर्यतीत आपला भारत कुठे आहे, पाहू
advertisement
1/9

आपण अनेकदा फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करतो किंवा परदेशातून काही मागवतो, तेव्हा एक गोष्ट आपलं बजेट ठरवायला मदत करते ती म्हणजे 'डॉलर'चा भाव. टीव्हीवर किंवा मोबाईलवर "रुपया डॉलरच्या तुलनेत पुन्हा घसरला" अशी बातमी दिसली की अनेकांच्या मनात धस्स होतं. आपल्याला वाटतं की आपला रुपया खूप कमजोर झालाय का?
advertisement
2/9
पण थांबा! तुम्हाला माहीत आहे का, जगात असे काही देश आहेत जिथे 1 डॉलर खरेदी करण्यासाठी तेथील लोकांना चक्क हजारो नोटांची थप्पी घेऊन जावी लागते. त्या देशांच्या तुलनेत आपला रुपया आजही खूप ताठ मानेने उभा आहे. चला तर मग, जगातील सर्वात 'कंगाल' चलनं कोणते आणि त्या शर्यतीत आपला भारत कुठे आहे, पाहू
advertisement
3/9
1. लेबनानी पाउंड (Lebanese Pound) - खिशात हजारो नोटा, पण किंमत शून्य!सध्या लेबनान हा देश जगातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. तिथे परिस्थिती इतकी वाईट आहे की, लोकांकडे पैसे आहेत पण त्यांना किंमत नाही. 1 डॉलर मिळवण्यासाठी तुम्हाला 89,819 लेबनानी पाउंड मोजावे लागतील. विचार करा, एखादी साधी कॉफी प्यायची झाली तरी तिथे किती नोटा द्याव्या लागत असतील.
advertisement
4/9
2. इराणी रियाल (Iranian Rial) - निर्बंधांचा मोठा फटकाइराण हा देश तेलासाठी प्रसिद्ध असला, तरी अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे तिथल्या 'रियाल'ची अवस्था वाईट झाली आहे. राजकीय तणावामुळे इथलं चलन जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात कमकुवत चलन ठरलं आहे. इथे 1 डॉलरची किंमत 42,112 रियालच्या आसपास आहे.
advertisement
5/9
3. व्हिएतनामी डोंग (Vietnamese Dong) - ही तर सरकारची 'चाल'विशेष म्हणजे व्हिएतनामची अर्थव्यवस्था संकटात नाही, तर ती वेगाने प्रगती करत आहे. मग तिथलं चलन इतकं स्वस्त का? तर, आपली निर्यात वाढवण्यासाठी आणि जगाला आपला माल स्वस्त वाटावा यासाठी तिथलं सरकार मुद्दाम चलनाचं मूल्य कमी ठेवतं. 1 डॉलरसाठी तुम्हाला 26,370 डोंग खर्च करावे लागतात.
advertisement
6/9
मग आपला भारतीय रुपया नक्की कुठे आहे?2025-26 मध्ये भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 90 च्या आसपास पोहोचला असला, तरी जगभरातील सर्वात कमकुवत चलनांच्या यादीत भारताचा नाव टॉप 25 मध्येही येत नाही. याचाच अर्थ, रुपया आजही जगातील अनेक देशांच्या तुलनेत खूप मजबूत आणि स्थिर आहे.
advertisement
7/9
रुपया 90 वर का गेला?1. जागतिक कारणं: जगभरात डॉलरची मागणी अचानक वाढली आहे.2. गुंतवणूक: परदेशी कंपन्यांनी नफा कमावून आपला पैसा डॉलरमध्ये कन्व्हर्ट करून बाहेर नेल्यामुळे रुपयावर दबाव येतो.3. कच्चं तेल: आपण तेल आयात करण्यासाठी डॉलर देतो, त्यामुळे डॉलरची किंमत वाढते.
advertisement
8/9
भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आपल्याकडे परकीय चलनाचा साठा (Forex Reserve) प्रचंड आहे आणि देशाची राजकीय परिस्थिती स्थिर आहे. त्यामुळे जरी रुपया थोडा घसरला असला, तरी लेबनान किंवा इराणसारखी परिस्थिती भारतात कधीच येणार नाही.
advertisement
9/9
थोडक्यात सांगायचं तर: रुपया घसरला म्हणजे अर्थव्यवस्था संपली असं नसतं. तो जागतिक व्यापाराचा एक भाग आहे. इतर अनेक देशांच्या तुलनेत आपला रुपया आजही एक सुरक्षित चलन मानलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Currency : डॉलरच्या तुलनेत जगातलं सगळ्यात कमजोर चलन कोणतं? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?