TRENDING:

Gold : मेकिंग चार्जेस शिवाय किती रुपयांमध्ये बनेल 18 कॅरेट सोन्याची चेन? यावर किती द्यावा लागतो GST?

Last Updated:
18 Karat Gold : जर तुम्ही स्वतःसाठी किंवा कोणाला भेट देण्यासाठी सोन्याची चेन बनवण्याचा विचार करत असाल, तर '18 कॅरेट' हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पण 18 कॅरेट सोन्याची चेन नक्की कितीला पडते? त्यावर जीएसटी किती लागतो? आणि मेकिंग चार्जेसशिवाय त्याचं गणित कसं मांडायचं? हे सर्व आजच्या ताज्या दरांसह समजून घेऊया.
advertisement
1/6
मेकिंग चार्जेस शिवाय किती रुपयांमध्ये बनेल 18 कॅरेट सोन्याची चेन? किती GST लागेल
लग्नसराईचे दिवस असोत किंवा एखादा खास सण, आपल्याकडे सोनं खरेदी करण्याला एक वेगळंच महत्त्व आहे. सोन्याचा एखादा छोटासा दागिना असला तरी तो चेहऱ्यावर हास्य आणि मनात समाधानाची भावना घेऊन येतो. पण सध्या सोन्याच्या दरांनी जो 'रॉकेट' वेग पकडला आहे, तो पाहून सामान्य माणसाच्या मनात एकच धकधक सुरू असते "आज काय भाव असेल?" त्यात आजकाल ज्यापद्धतीने दररोज सोन्याचे भाव वरखाली होत आहेत, सामान्य लोकांचं लक्ष पूर्णपण त्याच्या किंमतीवरच लागून आहे.
advertisement
2/6
अशातच जर तुम्ही स्वतःसाठी किंवा कोणाला भेट देण्यासाठी सोन्याची चेन बनवण्याचा विचार करत असाल, तर '18 कॅरेट' हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पण 18 कॅरेट सोन्याची चेन नक्की कितीला पडते? त्यावर जीएसटी किती लागतो? आणि मेकिंग चार्जेसशिवाय त्याचं गणित कसं मांडायचं? हे सर्व आजच्या ताज्या दरांसह समजून घेऊया.
advertisement
3/6
सोन्याच्या दरात आज मोठी उडीआज म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. सराफा बाजारातील ताज्या घडामोडींनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,078 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर, दागिन्यांसाठी वापरलं जाणारं 22 कॅरेट सोनं 14,369 रुपये प्रति ग्रॅमवर आहे. पण जर तुमचं बजेट थोडं मर्यादित असेल आणि तुम्हाला मजबूत दागिना हवा असेल, तर 18 कॅरेट सोनं आज 11,759 रुपये प्रति ग्रॅम दराने उपलब्ध आहे.
advertisement
4/6
18 कॅरेट सोनं स्वस्त का असतं?अनेकांना प्रश्न पडतो की 18 कॅरेट म्हणजे नेमकं काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर, 18 कॅरेट सोन्यात 75% शुद्ध सोनं असतं आणि उर्वरित 25% इतर धातू मिसळलेले असतात. यामुळे हे सोनं 22 किंवा 24 कॅरेटपेक्षा स्वस्त असतं. पण याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे सोनं जास्त मजबूत असतं, त्यामुळे नाजूक डिझाइनच्या चेन किंवा रोज वापरायच्या दागिन्यांसाठी 18 कॅरेटला अधिक पसंती दिली जाते.
advertisement
5/6
18 कॅरेट सोन्याच्या 5 ग्रॅम चेनचं पूर्ण 'गणित'समजा, तुम्हाला 5 ग्रॅम वजनाची 18 कॅरेट सोन्याची साधी चेन खरेदी करायची आहे. तर तुमचं बिल कसं तयार होईल ते पहातुम्ही सोन्याची चेन मेकिंग चार्जेस देऊन बनवा किंवा न देता, भारत सरकारच्या नियमांनुसार दागिन्यांवर 3 टक्के जीएसटी (GST) देणे अनिवार्य आहे. सोन्याच्या शुद्धतेनुसार दर बदलतात, पण जीएसटीचा दर मात्र स्थिर असतो. त्यामुळे वरील गणितात पाहिल्याप्रमाणे 5 ग्रॅमच्या चेनवर तुम्हाला साधारण 1764 रुपये कर भरावा लागेल.
advertisement
6/6
सोने खरेदी करताना हे लक्षात ठेवा:हॉलमार्किंग: 18 कॅरेट दागिन्यांवर 750 असा हॉलमार्क मार्क असतो, तो तपासूनच खरेदी करा.मेकिंग चार्जेस: अनेकदा ज्वेलर्स मेकिंग चार्जेसवर सवलत देतात, अशा वेळी वरीलप्रमाणे सोन्याच्या मूळ किमतीचा हिशोब तुमच्या फायद्याचा ठरेल.नेहमी पक्की पावती घ्या, ज्यावर सोन्याचे वजन आणि कॅरेटचा स्पष्ट उल्लेख असेल.तुम्ही या लग्नसराईत 18 कॅरेट सोनं खरेदी करण्याचा विचार करत आहात का? हा हिशोब तुम्हाला कसा वाटला, कमेंट्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold : मेकिंग चार्जेस शिवाय किती रुपयांमध्ये बनेल 18 कॅरेट सोन्याची चेन? यावर किती द्यावा लागतो GST?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल