TRENDING:

Toll Plaza : भारतामधील सर्वाधिक कमाई करणारे टोल प्लाझा कोणते? टॉप 5 मध्ये ना दिल्ली ना मुंबई

Last Updated:
नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय महामार्गांनी कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. देशातील कोणत्या टोल नाक्यावर सर्वाधिक वसुली होते आणि तुमच्या जवळचा टोल नाका या यादीत आहे का? हे जाणून घेऊया.
advertisement
1/12
भारतामधील सर्वाधिक कमाई करणारे टोल प्लाझा कोणते? टॉप 5 मध्ये ना दिल्ली ना मुंबई
आपण जेव्हा कुटुंबासोबत फिरायला निघतो किंवा कामानिमित्त एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करतो, तेव्हा मोठे हायवे आणि एक्स्प्रेसवे आपला प्रवास सुखकर करतात. पण या प्रवासादरम्यान टोल नाक्यावर थांबून टॅक्स भरणे हा आपल्या पाचवीलाच पुजलेला नियम आहे. कधी फास्टॅगमुळे (FASTag) काम सोपं होतं, तर कधी लांबच लांब रांगांमुळे आपल्याला मनस्ताप होतो. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या खिशातून जाणारा हा टोलचा पैसा सरकारचा खजिना किती वेगाने भरत आहे?
advertisement
2/12
नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय महामार्गांनी कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. देशातील कोणत्या टोल नाक्यावर सर्वाधिक वसुली होते आणि तुमच्या जवळचा टोल नाका या यादीत आहे का? हे जाणून घेऊया.
advertisement
3/12
5 वर्षांत 2.27 लाख कोटींची विक्रमी वसुलीरस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) 11 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यसभेत एक महत्त्वाची माहिती दिली. गेल्या पाच आर्थिक वर्षांत (2021-22 ते 2024-25) राष्ट्रीय महामार्ग आणि एक्स्प्रेसवेवरून तब्बल 2.27 लाख कोटी रुपयांचा टोल जमा झाला आहे. ही रक्कम इतकी मोठी आहे की त्यातून अनेक नवीन महामार्ग उभे राहू शकतात.
advertisement
4/12
भारतातील 'टॉप 6' टोल प्लाझा: कोण आहे श्रीमंत?2019-2020 ते 2023-2024 या पाच वर्षांच्या कालावधीतील सविस्तर आकडेवारीनुसार, सर्वाधिक कमाई करणाऱ्या टोल नाक्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.
advertisement
5/12
1. टोल प्लाझा (गुजरात) - नंबर 1 चा 'किंग'गुजरातच्या वडोदरा-भरूच पट्ट्यात राष्ट्रीय महामार्ग 48 वर असलेला हा टोल नाका भारताचा सर्वाधिक कमाई करणारा नाका ठरला आहे.एकूण कमाई 2.043.81 कोटी रुपये (5 वर्षांत).येथून वर्षाला 1 कोटींहून अधिक वाहने जातात, ज्यात व्यापारी ट्रक्सची संख्या मोठी आहे. हा रस्ता कंडला आणि मुंद्रा बंदरांना जोडणारा महत्त्वाचा औद्योगिक कॉरिडॉर आहे.
advertisement
6/12
2. शाहजहानपूर टोल प्लाझा (राजस्थान)दिल्ली-जयपूर महामार्गावरील (NH-48) या नाक्याचा क्रमांक दुसरा लागतो.एकूण कमाई: 1,88,4.46 कोटी रुपये.दिल्ली आणि जयपूरला जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने येथे पर्यटक आणि व्यावसायिक वाहनांची मोठी वर्दळ असते.
advertisement
7/12
3. जलाधुलागोरी टोल प्लाझा (पश्चिम बंगाल)कोलकाता ते चेन्नई जोडणाऱ्या NH-16 वरील या नाक्याने तिसरे स्थान पटकावले आहे.एकूण कमाई: 1,538.91 कोटी रुपये.हलदिया आणि कोलकाता बंदरातून येणाऱ्या मालवाहतुकीमुळे याची कमाई प्रचंड आहे.
advertisement
8/12
4. बरजोरे टोल प्लाझा (उत्तर प्रदेश)ऐतिहासिक ग्रँड ट्रंक रोडवर (NH-19) कानपूर जवळ असलेला हा नाका चौथ्या स्थानी आहे.एकूण कमाई: 1,480.75 कोटी रुपये.कानपूरमधील औद्योगिक क्षेत्रातील मालवाहतुकीचा हा कणा आहे.
advertisement
9/12
5. घरौंडा टोल प्लाझा (हरियाणा)दिल्ली-चंदीगड कॉरिडॉरवरील (NH-44) या नाक्याने पाचवे स्थान मिळवले आहे.एकूण कमाई: 1,314.37 कोटी रुपये.येथे 'बॅरियर-फ्री' टोलिंगचा पायलट प्रोजेक्ट सुरू आहे, ज्यामुळे ट्रॅफिक कमी होण्यास मदत होईल.
advertisement
10/12
6. चोर्यासी टोल प्लाझा (गुजरात)सुरतच्या कापड आणि हिरा उद्योगाला बंदरांशी जोडणाऱ्या या नाक्याची सहाव्या क्रमांकावर वर्णी लागली आहे.अंदाजे 1,261 कोटी रुपये.हे भारताचे पहिले 'बॅरियर-फ्री' टोल प्लाझा आहे आणि इथे MLFF यंत्रणेद्वारे गाड्या न थांबता टोल वसूल केला जातो.
advertisement
11/12
स्थानिक रहिवाशांसाठी दिलासाया कोट्यवधींच्या वसुलीमध्ये महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) स्थानिक लोकांना विसरलेले नाही. आजूबाजूच्या गावांत राहणाऱ्या पात्र रहिवाशांना 'झिरो युजर फी' (Zero User Fee) असलेले फ्री पासेस देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून स्थानिकांना रोजच्या प्रवासात आर्थिक फटका बसणार नाही.
advertisement
12/12
महामार्गांचे जाळे जसे विस्तारत आहे, तशीच सरकारची कमाईही वाढत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि बॅरियर-फ्री टोलिंगमुळे भविष्यात रांगा कमी होतील आणि प्रवास अधिक सुलभ होईल, अशी आशा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Toll Plaza : भारतामधील सर्वाधिक कमाई करणारे टोल प्लाझा कोणते? टॉप 5 मध्ये ना दिल्ली ना मुंबई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल