Alcohol Fact : गोवा मध्ये दारू स्वस्त आणि महाराष्ट्रामध्ये महाग का? यामागचं गणित काय?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
why alcohol cheap in goa : खरंतर यामागे कोणतीही गुंतागुंतीची आंतरराष्ट्रीय डील नाही. हे सगळं गणित खूप साधं आहे आणि ते तुमच्या आमच्या नव्हे, तर सरकारच्या टॅक्स धोरणांवर अवलंबून आहे.
advertisement
1/7

फक्त दारु प्रेमीच नाही नाही तर आता सगळ्यांना हे माहितच झालं आहे की गोवामध्ये महाराष्ट्रापेक्षा स्वस्त दारु मिळते. त्यामुळे लोक तिथे फिरायला जातात किंवा तिथून दारु आणण्याचा विचार करतात. पण गोव्यात मिळणारी दारू महाराष्ट्राच्या तुलनेत कधीकधी अर्ध्या किमतीत मिळते. पण असं का होतं? असा कधी प्रश्न पडला आहे का?
advertisement
2/7
खरंतर यामागे कोणतीही गुंतागुंतीची आंतरराष्ट्रीय डील नाही. हे सगळं गणित खूप साधं आहे आणि ते तुमच्या आमच्या नव्हे, तर सरकारच्या टॅक्स धोरणांवर अवलंबून आहे.
advertisement
3/7
दारूच्या किमतीत इतका मोठा फरक येण्याचं मुख्य कारण म्हणजे 'अबकारी कर' (Excise Duty). हा एक असा टॅक्स आहे जो दारूच्या उत्पादन किंवा विक्रीवर राज्य सरकारकडून लावला जातो. आणि गंमत म्हणजे, प्रत्येक राज्याला हा टॅक्स किती ठेवायचा, याचा निर्णय स्वतः घ्यायचा अधिकार असतो.
advertisement
4/7
गोवा: 'येथे या आणि मजा करा' धोरण. गोवा हे पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून असलेले राज्य आहे. त्यांना जगभरातील पर्यटक हवे असतात. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोव्याने हुशारीने दारूवरील अबकारी कर जाणीवपूर्वक खूप कमी ठेवला आहे. 'दारू स्वस्त ठेवा, पर्यटक आपोआप येतील आणि बाकीचे खर्च करतील' हेच त्यांचे साधे लॉजिक आहे. त्यामुळे, तिथे बाटलीची अंतिम किंमत कमी राहते.
advertisement
5/7
महाराष्ट्र: 'तिजोरी भरा' धोरण, महाराष्ट्र हे एक मोठे राज्य आहे, आणि राज्याचा गाडा चालवण्यासाठी मोठ्या महसुलाची (Revenue) गरज असते. राज्यातील विविध विकासकामांसाठी लागणाऱ्या पैशांचा एक मोठा भाग दारूवरील करातून मिळतो. त्यामुळे, महाराष्ट्रात अबकारी कर गोव्याच्या तुलनेत खूप जास्त असतो.
advertisement
6/7
'टॅक्स' नावाचे आणखी काही खेळाडूअबकारी कराव्यतिरिक्त, आणखी दोन-तीन गोष्टी किमती वाढवतात:VAT आणि इतर टॅक्स: प्रत्येक वस्तूवर लागणारा व्हॅट (VAT) किंवा विक्रीकर (Sales Tax) महाराष्ट्रात दारूवर जास्त असतो.दुकान चालवण्याचा खर्च (लायसन्स फी): दारूचे दुकान, बार किंवा उत्पादन युनिट चालवण्यासाठी सरकारला जी फी (Fees) भरावी लागते, ती महाराष्ट्रात जास्त असू शकते. गोव्यात या गोष्टी थोड्या स्वस्त आणि सोप्या आहेत.
advertisement
7/7
मित्रांनो, आता तुम्हाला हे गणित कळले असेल की गोव्यात दारू का स्वस्त आहे. त्यामुळे, गोव्यातून येताना बाटल्या भरून महाराष्ट्रात आणण्याचा मोह अनेकांना होतो. पण, इथे एक कायदेशीर गोष्ट लक्षात ठेवा. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात दारू आणण्यासाठी परवाना (Permit) आवश्यक असतो. विना परवाना दारू घेऊन येणे बेकायदेशीर ठरते आणि पकडले गेल्यास दंड किंवा कायदेशीर कारवाई होऊ शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Alcohol Fact : गोवा मध्ये दारू स्वस्त आणि महाराष्ट्रामध्ये महाग का? यामागचं गणित काय?