TRENDING:

Weather Alert: महाराष्ट्राचा पारा चढला, शिमग्याआधीच मोठं संकट, कोकण ते विदर्भ अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल जाणवत असून तापमानाचा पारा चढला आहे. शनिवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
महाराष्ट्राचा पारा चढला, शिमग्याआधीच मोठं संकट, कोकण ते विदर्भ अलर्ट
नव्या वर्षाची सुरुवात होऊन बघता बघता फेब्रुवारी महिना संपत आला आहे. यंदा हिवाळ्याने राज्यातून लवकरच निरोप घेतला असून थंडीचा प्रभाव जवळपास कमी झाला आहे. शिमगा जवळ येत असताना राज्यभर उन्हाचा पारा हळूहळू वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ नोंदली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर 21 फेब्रुवारी रोजीही राज्यात उष्ण व कोरडे हवामान राहणार आहे. कोकण ते विदर्भ हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात आज उष्ण आणि दमट वातावरण राहील. आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवेल. मुंबईत कमाल तापमान सुमारे 32 ते 34 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 22 ते 24 अंश दरम्यान राहील. दुपारी सूर्यप्रकाश तीव्र असेल आणि समुद्रकिनारी भागात दमटपणा वाढलेला जाणवेल.
advertisement
3/5
पश्चिम महाराष्ट्रात सकाळच्या वेळी थोडासा गारवा जाणवेल, मात्र दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर उष्णतेची तीव्रता वाढेल. पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा परिसरात कमाल तापमान 34 ते 36 अंश, तर किमान तापमान 17 ते 19 अंश दरम्यान राहील. दिवस गरम आणि कोरडा राहील, तर संध्याकाळी वातावरण थोडे आल्हाददायक होईल
advertisement
4/5
मराठवाडा आणि विदर्भ विभागात उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवेल. औरंगाबाद, लातूर, परभणी, नांदेड तसेच नागपूर, अमरावती, अकोला भागात कमाल तापमान 35 ते 37 अंश, तर किमान तापमान 19 ते 22 अंश दरम्यान राहील. दुपारच्या सुमारास कडक ऊन पडेल आणि उष्ण वाऱ्यांची हलकी झुळूक जाणवू शकते.
advertisement
5/5
एकंदरीत 21 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात कोरडे आणि प्रामुख्याने उन्हाळी हवामान राहील. कालच्या तुलनेत तापमानात फारसा बदल जाणवणार नाही; मात्र काही भागांत 1 अंशाने वाढ होऊ शकते. पुढील काही दिवसांतही अशीच उष्णता कायम राहण्याची शक्यता आहे आणि मार्चच्या सुरुवातीपर्यंत तापमानात हळूहळू वाढ होत राहील. नागरिकांनी दुपारच्या वेळेत उन्हापासून काळजी घ्यावी आणि पुरेसे पाणी प्यावे, अशी सूचना करण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: महाराष्ट्राचा पारा चढला, शिमग्याआधीच मोठं संकट, कोकण ते विदर्भ अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल