Weather Alert : पुढील 24 तास धोक्याचे, महाराष्ट्रात पुन्हा हिम लाट, हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
काही जिल्ह्यांमध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. 29 डिसेंबरचे हवामान कसे असणार जाणून घेऊयात.
advertisement
1/5

राज्यात हिवाळ्याचा प्रभाव अद्याप कायम असून किमान तापमानात सातत्याने बदल होत असल्याचं चित्र आहे. विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळी अनेक भागांत गारठा अधिक जाणवत आहे. काही जिल्ह्यांमध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. 29 डिसेंबरचे हवामान कसे असणार जाणून घेऊयात.
advertisement
2/5
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात 29 डिसेंबर रोजी हवामान प्रामुख्याने कोरडं राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत कमाल तापमान सुमारे 33 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. दिवसभर आकाश निरभ्र असणार असलं, तरी सकाळी आणि रात्री हलका गारवा जाणवणार आहे. किनारपट्टी भागांत थंडी सौम्य असली तरी हवेतील कोरडेपणा जाणवू शकतो.
advertisement
3/5
पुणे शहरात थंडीचा प्रभाव तुलनेने अधिक जाणवत असून 29 डिसेंबर रोजी किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहील. सकाळच्या सुमारास धुक्याचं प्रमाण वाढू शकतं, त्यामुळे वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
advertisement
4/5
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर अधिक तीव्र आहे. नाशिकमध्ये किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून निफाड आणि धुळे परिसरात तापमान 10 अंशांच्या खाली घसरल्याने सकाळच्या वेळी गारठा वाढला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही थंडी कायम आहे.
advertisement
5/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे पहाटे थंड वातावरण राहणार असून किमान तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात नागपूरमध्येही थंडी कमी झालेली नसून किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील विविध भागांत किमान तापमानात होणाऱ्या चढ-उतारांमुळे थंडीचा प्रभाव कधी वाढतो, तर कधी कमी होतो. हवामानात सातत्याने बदल होत असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert : पुढील 24 तास धोक्याचे, महाराष्ट्रात पुन्हा हिम लाट, हवामान विभागाचा अलर्ट