गुंगीचे औषध देऊन सामूहिक अत्याचार
नागपूर येथील एका अल्पवयीन मुलीला अशाच प्रकारे जाळ्यात ओढून यवतमाळात आणले गेले होते. त्या मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी शोधमोहीम राबवून पीडितेची सुटका केली. ऑनलाइन ओळखीचे रूपांतर अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये होत असल्याने सामाजिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
advertisement
आसाममधून मुलगी यवतमाळमध्ये दाखल
आसाम येथून एक मुलगी यवतमाळ शोधत प्रियकराच्या घरी पोहोचली. त्या मुलीला मुलीला पाहून प्रियकराच्या कुटुंबीयाला धक्का बसला. प्रकरण पोलिसांकडे गेले. नंतर बालकल्याण समितीपुढे त्या अल्पवयीन मुलीला सादर करण्यात आले. तेथे तिचे समुपदेशन करून मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. नंतर पोलिस संरक्षणात तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्या गेले.
तीन मुली प्रियकराच्या शोधात
गुजरात राज्यातील अल्पवयीन मुलगी इन्स्टाग्रामवरील प्रेमातून यवतमाळात आली. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी मुंबई दादर येथील मुलगी यवतमाळात प्रियकराला शोधत पोहोचली होती. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत तीन मुली प्रियकराच्या शोधात आल्या आहेत.
तुमची मुलं मोबाईलवर काय करतात?
मुले कोणाशी बोलतात, त्यांचे मित्र कोण आहेत आणि ते मोबाईलवर नेमके काय करतात, याकडे पालकांनी बारकाईने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. बालकल्याण समितीचे सदस्य अनिल गायकवाड यांनी पालकांना आवाहन केले आहे की, मुलांशी सुसंवाद साधून त्यांना धोक्यांची जाणीव करून दिली पाहिजे. सोशल मीडियाचा वापर करताना दोन वेळा विचार करणे आवश्यक असल्याचे या घटनांवरून स्पष्ट होते.
