Weather Update : कल्याण-डोंबिवली हवामानात मोठे बदल, थंडीची लाट येणार? हवामान खात्याचं महत्त्वाचं अपडेट
- Reported by:
- Published by:Mohan Najan
Last Updated:
वातावरणामुळे एकीकडे नागरिकांना गारवा, उबदारपणा आणि उन्हाचा सामना कराव लागणार आहे. तापमानात चढउतार होत असताना 29 डिसेंबर कल्याण डोंबिवली शहरातील हवामान अंदाज कसा असेल पाहूया.
advertisement
1/5

राज्यात येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात मोठी घट होण्याची शक्यता असून, 1 जानेवारीपर्यंत थंडीचा कडाका चांगलाच वाढणार आहे. सकाळी थंडी तर दिवसा ऊबदारपणा या रंग बदलत्या वातावरणामुळे एकीकडे नागरिकांना गारवा, उबदारपणा आणि उन्हाचा सामना कराव लागणार आहे. तापमानात चढउतार होत असताना 29 डिसेंबर कल्याण डोंबिवली शहरातील हवामान अंदाज कसा असेल पाहूया.
advertisement
2/5
कल्याण तालुक्यात 29 डिसेंबर हवामान स्वच्छ आणि कोरडे असणार आहे. काही दिवस हवामानाची हिच स्थिती बघायला मिळेल कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस ते किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. ज्यामुळे दिवसा ऊबदार आणि रात्री थंड वाटत होते.
advertisement
3/5
ठाणे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असताना,डोंबिवली शहरात 29 डिसेंबर किमान तापमान 15 अंश ते कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. सकाळी आणि संध्याकाळ जास्त थंडी तर दिवसा उबदार हवामान असल्याने नागरिकांनी थंडीपासून बचाव मिळवण्यासाठी काळजी घ्यावी.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात 29 डिसेंबर आज हवामान स्वच्छ आणि दिवसा उन्हाचे चटके जाणवतील. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस ते किमान तापमान 20 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
बदलापूर शहरात 29 डिसेंबर हवामान कोरडे राहील. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमानात 17 अंश सेल्सिअस असल्याने दिवसा ऊन आणि हलकी उष्णता जाणवेल. मुरबाड शहापूर तालुक्यातील हवामान स्वच्छ आणि थंड असल्याने कमाल तापमान 30अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 12 अंश सेल्सिअस असेल थंड हवामानामुळे सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे हवामान विभागाकडून वर्तविण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Update : कल्याण-डोंबिवली हवामानात मोठे बदल, थंडीची लाट येणार? हवामान खात्याचं महत्त्वाचं अपडेट