TRENDING:

Religious: गुरुवारी श्रीहरी विष्णुला अर्पण कराव्या या 3 गोष्टी; प्रत्येक इच्छा होते पूर्ण, लग्नाला ग्रीन सिग्नल

Last Updated:

Guruwar Puja: गुरुवार हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी श्रीहरी नारायणाची पूजा करणे अत्यंत फळदायी मानले जाते. गुरुवारच्या व्रताला आणि पूजेला शास्त्रात विशेष महत्त्व आहे, कारण हा दिवस देवगुरु बृहस्पती यांचाही मानला जातो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. गुरुवार हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी श्रीहरी नारायणाची पूजा करणे अत्यंत फळदायी मानले जाते. गुरुवारच्या व्रताला आणि पूजेला शास्त्रात विशेष महत्त्व आहे, कारण हा दिवस देवगुरु बृहस्पती यांचाही मानला जातो. कोणाच्या कुंडलीत गुरू ग्रह कमकुवत असेल तर गुरुवारी काही विशेष गोष्टी अर्पण केल्याने जीवनातील संकटे दूर होतात. भगवान विष्णूंना अर्पण करायच्या महत्त्वाच्या गोष्टी पाहुया..
News18
News18
advertisement

गुरुवारची पूजा केल्याने श्रीहरीची कृपा कुटुंबावर कायम राहते, जीवनात अनेक गोष्टी सहज सोप्या होऊ लागतात. धार्मिक श्रद्धा असलेले कित्येक भाविक गुरुवारी विष्णू कृपेसाठी पूजा-विधी करतात, काही खास गोष्टी केल्याने त्याचा परिणाम लवकर दिसून येतो, असे मानले जाते.

गूळ: गुरुवारी भगवान विष्णूंना गुळाचा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा येतो. गुळाचा संबंध गुरु ग्रहाशी आहे. असे मानले जाते की गूळ अर्पण केल्याने पती-पत्नीमधील वाद मिटतात आणि वैवाहिक जीवनात मधुरता येते. तुमच्या नात्यात दुरावा असेल, तर गुळाचा नैवेद्य श्रद्धेने अर्पण करा.

advertisement

चण्याची डाळ: श्रीहरी विष्णूंना चण्याची डाळ अत्यंत प्रिय आहे. पिवळा रंग हा विष्णूंचा आवडता रंग मानला जातो आणि चण्याची डाळ पिवळी असल्याने ती पूजेत असणे अनिवार्य आहे. चण्याची डाळ अर्पण केल्याने घरातील दारिद्र्य दूर होते आणि आर्थिक अडचणींपासून सुटका मिळते. अनेक भाविक चण्याच्या डाळीसोबत थोडी हळदही अर्पण करतात.

केळी: गुरुवारी केळी अर्पण करणे किंवा केळीच्या झाडाची पूजा करणे खूप शुभ असते. केळी अर्पण केल्याने अडकलेली कामे मार्गी लागतात आणि रखडलेले विवाह योग जुळून येतात. ज्यांचे लग्न होईना झालंय, विवाह लांबणीवर पडत आहे, त्यांनी दर गुरुवारी विष्णूंना केळी अर्पण करावीत, यामुळे मनोकामना लवकर पूर्ण होतात.

advertisement

महिनाभर अग्नीपासून जपा, विषबाधेचा धोका; मीन संक्रातीनंतर 5 राशींना अलर्ट

पूजेदरम्यान या गोष्टींची काळजी घ्या -

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कन्यादानाला तयार, पण अन्नदानाचं काय? इराण युद्धामुळं पुण्यातली लग्नं रद्द होण्याची वेळ, काय घडतंय? Video
सर्व पहा

विष्णूंच्या पूजेत तुळशीच्या पानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीशिवाय विष्णूंची पूजा आणि नैवेद्य दोन्ही अपूर्ण मानले जातात. त्यामुळे नैवेद्यात तुळशीचे पान आवर्जून ठेवा. श्री हरी विष्णूंना पिवळा रंग प्रिय असल्याने या दिवशी पिवळे कपडे परिधान करणे आणि देवाचा फोटो किंवा मूर्ती पिवळ्या कापडावर ठेवणे लाभदायक ठरते. विष्णू सहस्रनामाचा पाठ: या दिवशी विष्णू सहस्रनामाचा पाठ केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख-समृद्धी नांदते.

advertisement

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Religious: गुरुवारी श्रीहरी विष्णुला अर्पण कराव्या या 3 गोष्टी; प्रत्येक इच्छा होते पूर्ण, लग्नाला ग्रीन सिग्नल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल