Navi Mumbai : जमिनीवर पीठ, गटारीचं पाणी; चिली आणि टोमॅटो सॉसच्या फॅक्टरीत गलिच्छपणाचा कळस
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
प्रमोद पाटील, नवी मुंबई : कामोठ्यात सॉस बनवणारी कंपनी आहे. चिली सॉस आणि टोमॅटो सॉस बनवतात. अत्यंत गलिच्छ अशा वातावरणात हे सॉस तयार केले जातात.
advertisement
1/5

नवी मुंबईतील कामोठे येथे रेड चीली सॉस, सोया सॉस बनवणाऱ्या एका कंपनीतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या पदार्थापासून हे सॉस बनविले जाते ते पदार्थ निकृष्ट आणि घाणेरड्या स्थितीत आढळले.
advertisement
2/5
कामोठ्यात सॉस बनवणारी कंपनी आहे. चिली सॉस आणि टोमॅटो सॉस बनवतात. अत्यंत गलिच्छ अशा वातावरणात हे सॉस तयार केले जातात. जिथे सॉस तयार केले जातात तिथं अस्वच्छ असं वातावरण होतं.
advertisement
3/5
जिथं सॉस तयार केले जातात तिथे अस्वच्छता दिसून आली असून याप्रकरणी संबधित कंपनी विरोधात मनसेने औषध प्रशासन विभागाकडे लेखी तक्रार केलीय. संबंधित कंपनीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
advertisement
4/5
सॉस तयार करण्याच्या ठिकाणी जे पाणी बॅरेलमध्ये भरलं होतं ते अत्यंत गढूळ असं होतं. तसंच चिली पावडर जमिनीवरच ठेवली होती. त्या पावडरवर एक्स्पायरी डेटही नव्हती.
advertisement
5/5
घाणेरड्या जागी सॉस बनवले जाते. इथून सॉसचा पुरवठा नवी मुंबई, रायगड परिसरात होतो. अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Navi Mumbai : जमिनीवर पीठ, गटारीचं पाणी; चिली आणि टोमॅटो सॉसच्या फॅक्टरीत गलिच्छपणाचा कळस