TRENDING:

IND vs PAK : जय शाहांनी उलटवला पाकिस्तानचा डाव, झुकले, वाकले अन् भारताविरुद्ध खेळायलाही तयार झाले!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये 15 फेब्रुवारीला होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पाकिस्तान सरकारने या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती.
advertisement
1/6
जय शाहांनी उलटवला पाकिस्तानचा डाव, झुकले, वाकले अन् भारताविरुद्ध खेळायलाही तयार!
आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड 15 फेब्रुवारीला होणाऱ्या या सामन्याबाबत निर्णय घेण्याच्या जवळ पोहोचले आहेत. या सामन्याला पाकिस्तानकडून ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
advertisement
2/6
आयसीसीचे दोन प्रतिनिधी इम्रान ख्वाजा आणि मुबशिर उस्मानी रविवारी सकाळी लाहोरला पोहोचल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानने सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिल्यानंतर पीसीबी आणि आयसीसी यांच्यात चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
3/6
15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकला आहे, असं पाकिस्तान सरकारने सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केलं. मॅचवर बहिष्कार का टाकत आहे? याचं कोणतंही स्पष्टीकरण पाकिस्तान सरकारने दिलं नाही.
advertisement
4/6
बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळायला नकार दिल्यानंतर बांगलादेशऐवजी स्कॉटलंडची वर्ल्ड कपमध्ये एन्ट्री झाली. बांगलादेशला पाठिंबा म्हणून पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
advertisement
5/6
पाकिस्तानने बहिष्काराची धमकी दिल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डनेही पाकिस्तानला पत्र लिहून बहिष्काराचा पुनर्विचार करायला सांगितलं. तसंच बहिष्कारामुळे श्रीलंकेचं आर्थिक नुकसान होईल, असा उल्लेख श्रीलंकन क्रिकेट बोर्डने या पत्रात केला.
advertisement
6/6
कोणतीही टीम पाकिस्तानमध्ये खेळायला तयार नव्हती, तेव्हा आम्ही तुमच्या देशात येऊन खेळलो, अशी आठवणही श्रीलंका क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानला करून दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : जय शाहांनी उलटवला पाकिस्तानचा डाव, झुकले, वाकले अन् भारताविरुद्ध खेळायलाही तयार झाले!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल