NEP vs ENG : शेर मल्लाचा ड्रीम डेब्यू! पहिल्याच मॅचच्या पहिल्याच बॉलला दिग्गजाची विकेट, कोण आहे 23 वर्षीय खेळाडू?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
डेब्यूनंतर शेर मल्लाने वर्ल्ड कपच्या पहिल्याच ओव्हरच्या पहिल्याच बॉलला फिल सॉल्टला कॅच आऊट केले होते. त्यामुळे सॉल्ट एक धावांवर आऊट केलं होतं. या विकेटमुळे शेर मल्लासाठी ड्रीम डेब्यू झाला होता.
advertisement
1/8

आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये आज नेपाल आणि इंग्लंडमध्ये रोमांचक सामना सूरु आहे. वर्ल्डकपच्या या पहिल्याच सामन्यात नेपाल कडून शेर मल्लाने डेब्यू केला होता.
advertisement
2/8
या डेब्यूनंतर शेर मल्लाने वर्ल्ड कपच्या पहिल्याच ओव्हरच्या पहिल्याच बॉलला फिल सॉल्टला कॅच आऊट केले होते. त्यामुळे सॉल्ट एक धावांवर आऊट केलं होतं. या विकेटमुळे शेर मल्लासाठी ड्रीम डेब्यू झाला होता.
advertisement
3/8
विशेष म्हणजे या विकेटनंतर त्याची धुलाईही झाली. जेकॉब बेथेलने त्याच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या बॉलवर दोन षटकार आणि चौकार मारले होते. त्यामुळे विकेटचा आनंद फार काळ टीकू शकला नाही आहे.
advertisement
4/8
शेर मल्ला हा त्याच्या टी20 कारकिर्दीत पहिल्याच बॉलवर विकेट घेणारा दुसरा नेपाळी गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी 2014 च्या टी20वर्ल्ड कपमध्ये चॅटोग्राम येथे झालेल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पारस खडकाने हाँगकाँगच्या इरफान अहमदला बाद केले होते.त्यामुळे तो पहिला नेपाली गोलंदाज ठरला होता.
advertisement
5/8
दरम्यान वर्ल्ड कपच्या या पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विकेट घेणारा शेर मल्ला नेमका आहे तरी कोण? हे जाणून घेऊयात.
advertisement
6/8
शेर मल्लाचा जन्म हा 1 डिसेंबर 2002 रोजी झाला तो उजव्या हाताने ऑफ-ब्रेक गोलंदाजी आणि डाव्या हाताने फलंदाजी करतो.
advertisement
7/8
शेर मल्लाला 2026 च्या नेपाळ प्रीमियर लीग (एनपीएल)मधील 10 सामन्यांमध्ये 6.50 च्या इकॉनॉमी रेटने 17 विकेट्स घेत संयुक्तपणे सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता.,
advertisement
8/8
तसेच त्याने लुंबिनी लायन्सला स्पर्धा जिंकण्यास मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि इमर्जिंग-प्लेअर-ऑफ-द-टूर्नामेंट पुरस्कार पटकावला.याच कामगिरीची बक्षीस म्हणून त्याला वर्ल्ड कप संघात स्थान मिळालं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
NEP vs ENG : शेर मल्लाचा ड्रीम डेब्यू! पहिल्याच मॅचच्या पहिल्याच बॉलला दिग्गजाची विकेट, कोण आहे 23 वर्षीय खेळाडू?