TRENDING:

Mumbai Weather Update: पुढील 4 दिवस महत्त्वाचे, कोकणात अवकाळी पाऊस, मुंबईत काय स्थिती?

Last Updated:
मुंबई गारठली!! मुंबईमध्ये वाढली थंडी
advertisement
1/5
पुढील 4 दिवस महत्त्वाचे, कोकणात अवकाळी पाऊस, मुंबईत काय स्थिती?
राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. उत्तर भारतातील शीत लहरींमुळे राज्यातील तापामानात मोठी घट झालीये. काही ठिकाणी थंडीची लाट निर्माण झाल्याची स्थिती आहे. मुंबईत देखील यंदा 8 वर्षांतील निचांकी तापमान नोंदवलं गेलंय.
advertisement
2/5
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील किमान तापमानाचा पारा 20 अंशांच्या खाली आला होता. मात्र, आता त्यात पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे डिसेंबरचा पहिलाच आठवडा मुंबईकरांचा घाम काढण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
मुंबईत आज अंशत: ढगाळ हवामान असणार आहे. किमान तापमानात काहीशी वाढ होणार असून ते 21 अंशांवर राहण्याचा अंदाज आहे. तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस असेल. तर पुढील 4 दिवसांत किमान तापमानात 25 अंशांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
दिवाळीनंतर मुंबईत हवा प्रदुषणाची पातळी वाढली आहे. आज शहरातील एक्यूआय 227 पर्यंत राहणार असून ही हवा प्रदूषित मानली जाते. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.
advertisement
5/5
कोकणातील हवामानात देखील सातत्याने बदल होत आहेत. कोकणवासीय अजूनही थंडीच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच नवं संकट येण्याचा अंदाज आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिर, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात पुढील 3 दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Weather Update: पुढील 4 दिवस महत्त्वाचे, कोकणात अवकाळी पाऊस, मुंबईत काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल