TRENDING:

Pune ZP Result: भोर तालुक्यात कुणाचं पारडं जड? कोण मारणार बाजी? गावकऱ्यांची मत कुणाला?

Last Updated:

चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणांमधील ही निवडणूक ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखली जात असून काही गटांतील प्रतिष्ठेच्या लढतींमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष भोरकडे लागले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : भोर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून चुरशीच्या लढतींमुळे निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणांमधील ही निवडणूक ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखली जात असून, काही गटांतील प्रतिष्ठेच्या लढतींमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष भोरकडे लागले आहे.
News18
News18
advertisement

पहिल्या फेऱ्यांपासूनच आघाडी–पिछाडीचे चित्र बदलताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आव्हान आहे. अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत.

उत्रौली–कारी गट

या गटाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजीत शिवतारे आणि भाजपच्या माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे यांच्यातील थेट सामना या निवडणुकीतील सर्वात हायव्होल्टेज लढत मानली जात आहे. याशिवाय सतीश चव्हाण, सचिन नवघणे आणि संतोष घोरपडे हे उमेदवारही रिंगणात आहेत.

advertisement

वेळू–नसरापूर गट

या गटात पोपट सुके, गणेश खुटवड, अमोल पांगारे, अनिकेत शिंदे आणि जीवन कोंडे हे पाच उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

भोंगवली–कामथडी गट

महेश तापरे, वैभव धाडवे, विक्रम खुटवड, महादेव सोनवणे आणि चंद्रकांत बाठे यांच्यात येथे चुरशीची लढत झाली आहे.

भोलावडे–शिंद गट

विठ्ठल आभाळे, प्रवीण जगदाळे, अभिजीत धुमाळ, सागर धुमाळ आणि प्रमोद भालेराव हे उमेदवार या गटात रिंगणात आहेत.

advertisement

भोर तालुका  

  • लोकसंख्या: 1,67,663
  • पुरुष: 84,902
  • महिला: 82,761
  • नद्या: नीरा, वेळवंडी
  • महसुली गावे: 195
  • ग्रामपंचायती: 156
  • नगरपरिषद: भोर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुढील 24 तास महत्त्वाचे, कल्याण-डोंबिवलीवर दुहेरी संकट, IMD नं दिला अलर्ट
सर्व पहा

भोर तालुक्यात यावेळी 75.62 टक्के मतदान झाले असून ग्रामीण भागात मतदारांचा सहभाग लक्षणीय राहिला. प्रतिष्ठेच्या लढती, स्थानिक नेतृत्व आणि पारंपरिक वर्चस्वाला मिळालेले आव्हान यामुळे मतदानाचा टक्का वाढल्याचे चित्र आहे. या सर्व घटकांचा अंतिम निकालावर निर्णायक प्रभाव राहण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune ZP Result: भोर तालुक्यात कुणाचं पारडं जड? कोण मारणार बाजी? गावकऱ्यांची मत कुणाला?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल