माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचं चौथं लग्न, काँग्रेस नेत्यासोबत बांधली लग्नगाठ, इतर दोन बायका आल्या समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचे सुपुत्र आणि माजी मंत्री दीपक जोशी यांचं लग्न सध्या देशात चर्चेचा विषय ठरत आहे. 63 वर्षीय भाजपा नेत्याने 45 वर्षीय काँग्रेस नेत्या पल्लवी सक्सेनासोबत लग्न केलं आहे.
advertisement
1/9

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचे सुपुत्र आणि माजी मंत्री दीपक जोशी यांचं लग्न सध्या देशात चर्चेचा विषय ठरत आहे. 63 वर्षीय भाजपा नेत्याने 45 वर्षीय काँग्रेस नेत्या पल्लवी सक्सेनासोबत लग्न केलं आहे.
advertisement
2/9
४ डिसेंबर रोजी दोघांनी खासगी कार्यक्रमात आर्य समाजाच्या पद्धतीने विवाहगाठ बांधली आहे. पण आता यांचं लग्न एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत.
advertisement
3/9
पल्लवी सक्सेना यांनी अलीकडेच दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर दोन महिला समोर आल्या असून आपण दीपक जोशी यांच्या पत्नी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ज्यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे.
advertisement
4/9
यातील एका महिलेनं आपण दीपक जोशी यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा केला आहे. २०१६ मध्ये आपलं दीपक जोशी यांच्यासोबत लग्न झालं होतं, असं तिने म्हटलं आहे.
advertisement
5/9
दुसऱ्या एका महिलेनं आपण दीपक जोशी यांची तिसरी पत्नी असल्याचं म्हटलं आहे. यावर्षी २१ जानेवारीला आपलं लग्न झाल्याचं तिने म्हटलं आहे. दोन महिन्यांनी अशाप्रकारे दावा केल्याने दीपक जोशींसह पल्लवी सक्सेना देखील वादात सापडल्या आहेत.
advertisement
6/9
दीपक यांच्या इतर दोन लग्नाबद्दल आपल्याला आधी काहीच माहीत नव्हतं. मागील वर्षभरापासून मी दीपक जोशी यांच्यासोबत आहे. आम्ही एकत्र राहत होतो, पण अशाप्रकारे कोणतीही महिला समोर आली नव्हती, असं पल्लवी सक्सेना यांनी म्हटलं आहे.
advertisement
7/9
जून-जुलै महिन्यात माझा कुटुंबीयांच्या उपस्थितीत रोका झाला होता. तेव्हा देखील या महिलांबद्दल कुणाला काहीच कल्पना नव्हती. आता अचानक या महिला समोर आल्या आहेत. माझे पती स्वच्छ प्रतिमेचे आहेत. ते महिलांचा आदर-सन्मान करतात, असंही पल्लवी यांनी म्हटलं आहे.
advertisement
8/9
देशात एकीकडे भाजप आणि काँग्रेस राजकीय शत्रू असताना अशाप्रकारे भाजपचा नेता आणि काँग्रेसच्या महिला नेत्यांनी लग्न केल्यानेही या लग्नाची चर्चा सुरू आहे.
advertisement
9/9
दीपक जोशी १९८३ पासून राजकारणात आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. आता त्यांचा मुलगा देखील भाजपात आहे. तर पल्लवी सक्सेना काँग्रेसच्या माजी महिला सचिव आहेत. (सर्व फोटो क्रेडिट इंटरनेट)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचं चौथं लग्न, काँग्रेस नेत्यासोबत बांधली लग्नगाठ, इतर दोन बायका आल्या समोर