TRENDING:

Farmer Success Story: पारंपरिक शेतीला दिला फाटा, 26 गुंठ्यात मिळाला 60 हजार नफा

Last Updated:
Farmer Success Story: बदलत्या काळानुसार शेतकरी देखील आता शेतीमध्ये विविध प्रयोग करत आहेत. अनेक शेतकरी पारंपरिक पिकं न घेता कमी क्षेत्रामध्ये अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांचा पर्याय स्विकारत आहेत.
advertisement
1/5
Farmer Success Story: पारंपरिक शेतीला दिला फाटा, 26 गुंठ्यात मिळाला 60 हजार नफा
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील अल्पभूधारक शेतकरी विष्णू हराळे यांनी पारंपरिक शेतीला फाटा दिला आहे. त्यांनी अवघ्या 26 गुंठ्यात मुळ्याची लागवड केली आहे. यासाठी त्यांना केवळ 10 हजार रुपये खर्च आला आहे.
advertisement
2/5
मुळा लागवडी अगोदर शेतामध्ये नांगरणी करून त्यामध्ये शेणखत घातले. त्यानंतर रोटावेटर मारून मुळा बियाणांची लागवड केली. हराळे यांनी 26 गुंठ्यात 25 ते 30 हजार मुळा बियांची लागवड केली. लावलेल्या सर्वच बिया उगवतील की नाही याची खात्री नसते. त्यामुळे थोडी जास्त बियांची लागवड केली होती.
advertisement
3/5
मुळ्याची लागवड केल्यानंतर साधारण 40 ते 35 दिवसानंतर तो बाजारात विक्रीसाठी तयार होतो. विष्णू हराळे हे स्वतः आठवडी बाजारात आणि सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीस मुळ्याची विक्री करतात. स्वतः विक्री केल्यास अधिक उत्पन्न मिळते.
advertisement
4/5
लागवडीचा खर्च वजा करून 60 हजार रुपये उत्पन्न मुळा लागवडीतून आतापर्यंत हराळे यांना मिळालं आहे. अजूनही 26 गुंठ्यात मुळा असून त्याची काढणी केल्यास चार ते पाच हजाराचा उत्पन्न मिळणार आहे. म्हणजेच 40 दिवसांत 26 गुंठ्यातून हराळे यांना 65 हजारांचा नफा मिळणार आहे.
advertisement
5/5
पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीची कास धरून विविध पिकांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना शेतीतून नक्कीच फायदा मिळू शकतो, असा सल्ला शेतकरी विष्णू हराळे यांनी दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/फोटो गॅलरी/
Farmer Success Story: पारंपरिक शेतीला दिला फाटा, 26 गुंठ्यात मिळाला 60 हजार नफा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल