मुंबई महापालिकेत 29 नगरसेवक असलेल्या शिवसेनेच्या वाट्याला उपमहापौरपद आलं आहे.शिवसेनेचे नगरसेवक संजय घाडींची या पदावर वर्णी लागली आहे.साधारणता महापौर आणि उपमहापौरपदाची निवड ही अडीच वर्षांसाठी असते. मात्र संजय घाडी यांची उपमहापौरपदाची ही नियुक्ती केवळ सव्वावर्षासाठीच असल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. उपमहापौरपदासाठी शिवसेनेचा सव्वा वर्षांचा फॉर्म्युला का याची चर्चा सुरू झाली आहे. इकडं भाजपनं याविषयी कानावर हात ठेवलेत.
advertisement
भविष्यात पक्षातील जास्तीत जास्त नगरसेवकांना संधी
संजय घाडींच्या उपमहापौरपदाच्या सव्वा वर्षाच्या कार्यकाळानंतर त्यानंतर उर्वरित सव्वा वर्षांसाठी अन्य नगरसेवकाला संधी दिली जाणार आहे. सव्वा वर्षाच्या फॉम्युल्यामुळं भविष्यात पक्षातील जास्तीत जास्त नगरसेवकांना संधी देणं हा यामागील उद्देश असू शकतो. खरं तर शिवसेनेचा महापौर व्हावा अशी शिवसेनेची इच्छा होती. पण शिवसेनेची गाडी २९ वरचं अडकली आहे.
उपमहापौर पदासाठी काय आहे नियम?
उपमहापौर पद हे वैधानिक नसल्यामुळे या पदासाठी कोणतेही आरक्षण लागू होत नाही. नगरविकास विभागाच्या अध्यादेशानुसार महापौरपदाची निवडणूक दर अडीच वर्षांनी घेतली जाते आणि त्यानुसार महापौर पदासाठी आरक्षण जाहीर केलं जातं.मात्र उपमहापौर पदासाठी अशी कोणतंही आरक्षण नसल्याने हे पद पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या निर्णयावर अवलंबून असतं आणि आवश्यकतेनुसार बदलता येतं.
शिवसेनेकडून उपमहापौरपदाची संधी दिली जाण्याची शक्यता
शिवसेनेच्या सव्वा वर्षाच्या फॉम्युल्यामुळं सव्वा वर्षानंतर उपमहापौरपदाची निवडणूक होणार आहे.पाच वर्षाच्या कालावधीत चार जणांना शिवसेनेकडून उपमहापौरपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
भाजपकडून महापौरपदासाठी रितू तावडे यांची निवड
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या महापौरपदासाठी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडींची बिनविरोध निवड झाली आहे. आता फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. पुढील सव्वा वर्षांसाठी संजय घाडी उपमहापौर असणार आहेत. भाजपकडून रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती, पण रितू तावडे यांनी बाजी मारली. रितू तावडे या भाजपच्या मुंबईमधील पहिल्या महिला महापौर असणार आहेत.
हे ही वाचा :
