BMC मधील आतापर्यंतच्या महिला महापौरांचा इतिहास, कोणकोणत्या दिग्गजांना महापौरपदाची खुर्ची?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) 94 वर्षांच्या गौरवशाली इतिहासात आठव्यांदा मुंबईला महिला महापौर मिळणार आहे.
सुमीत सावंत, प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार महायुतीनं जाहीर केलेत. महापौरपदासाठी भाजपनं रितू तावडे यांचं नाव जाहीर केलं. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेनं संजय घाडी यांचं नाव जाहीर केलं. संजय घाडी यांना सव्वा वर्षासाठी उपमहापौरपद देण्यात आलंय. रितू तावडे यांची भाजपच्या ईशान्य मुंबईतील आक्रमक नेत्या म्हणून ओळख आहे. प्रभाग क्रमांक 132 घाटकोपर इथल्या गुजराती बहुल मतदारसंघातून त्या नगरसेविका म्हणून विजयी झाल्या आहेत.
advertisement
मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) 94 वर्षांच्या गौरवशाली इतिहासात आठव्यांदा मुंबईला महिला महापौर मिळणार आहे. हा क्षण केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.. रितू तावडे यांनी मुंबई पालिकेत त्यांनी शिक्षण समितीचं अध्यक्षपद, स्थापत्य समिती उपाध्यक्षपद अशी विविध पदं भूषवली आहेत.तर संजय घाडी हे शिवसेने उपनेते असून रायगड जिल्हा संपर्कप्रमुख आहेत. 1989 पासून भारतीय विद्यार्थी सेनेचे ते विभागप्रमुख होते. 1991 मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्षही होते. सलग दोन टर्म ते शिवसेनेचे नगरसेवक आहेत.
advertisement
मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा 1956 साली काँग्रेस पक्षाच्या सुलोचना मोदी या महापौर झाल्या. त्या काळात महिलांना सार्वजनिक जीवनात संधी मिळणे हीच मोठी गोष्ट होती. त्यामुळे सुलोचना मोदी यांचे महापौरपद हे सामाजिक परिवर्तनाचे महत्त्वाचे पाऊल ठरले. मात्र, त्यानंतर तब्बल 38 वर्षे म्हणजेच 1994 पर्यंत मुंबईला पुन्हा महिला महापौर मिळाल्या आहे.
आतापर्यंत झालेल्या महिला महापौरांची यादी
advertisement
- 1956 साली काँग्रेस पक्षाच्या सुलोचना मोदी या पहिल्यांदा मुंबईच्या पहिल्या महिला महापौर बनल्या होत्या.
- 1956 नंतर 1994 पर्यंत एकही महिला महापौर बनली नाही. थेट 1994-95 च्या कार्यकाळात काँग्रेसच्याच निर्मला सामंत प्रभावळकर या दुसऱ्या महिला महापौर बनल्या.
- यानंतर 1997-98 च्या काळात शिवसेनेच्या विशाखा राऊत महापौर बनल्या.
- 2007-2009 या कार्यकाळात शिवसेनेच्याच शुभा राऊळ यांना महापौर पदी विराजमान करण्यात आले.
- 2009-12 या काळात शिवसेनेच्या श्रद्धा जाधव यांच्याकडे मुंबई महापालिकेची धुरा होती.
- 2014 ते 2017 या काळात शिवसेनेच्या स्नेहल आंबेकर यांनी मुंबई महापालिकेचा कारभार सांभाळला.
- 2019 ते 2022 च्या काळात शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेत महापौर पद सांभाळालं
advertisement
आठव्यांदा मुंबईला महिला महापौर मिळणार
आता आठव्यांदा मुंबईला महिला महापौर मिळणार असल्याने ही परंपरा अधिक बळकट होणार आहे. मुंबईसारख्या महानगराच्या कारभारात महिलांचे नेतृत्व केवळ प्रेरणादायीच नव्हे, तर विकासाला नवी दिशा देणारे ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 5:57 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
BMC मधील आतापर्यंतच्या महिला महापौरांचा इतिहास, कोणकोणत्या दिग्गजांना महापौरपदाची खुर्ची?







