TRENDING:

IMD Monsoon Forecast : सावधान! महाराष्ट्राच्या दिशेनं येतय मोठं संकट; उरले फक्त काही तास, 15 जिल्ह्यांना हायअलर्ट

Last Updated:
परतीच्या पावसानं महाराष्ट्राला झोडपलं, आता पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/7
Monsoon Forecast : महाराष्ट्राच्या दिशेनं मोठं संकट, या जिल्ह्यांना हायअलर्ट
परतीच्या पावसानं महाराष्ट्राला झोडपलं, याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला. दरम्यान पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, आज हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
2/7
मुंबई आणि उपनगरांमध्ये आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाण्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
3/7
कोकणाबाबत बोलायचं झाल्यास कोकणामध्ये आज वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघरमध्ये या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यात देखील आज हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/7
विदर्भात देखील हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून, जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
6/7
मध्य महाराष्ट्रातही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याला आज हवामान खात्याकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासोबत कोल्हापूर आणि साताऱ्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
7/7
वायव्येकडच्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता आणखी वाढणार असल्यानं पुढील दोन ते तीन दिवस राज्यात जोरदार पाऊस पडू शकतो असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
IMD Monsoon Forecast : सावधान! महाराष्ट्राच्या दिशेनं येतय मोठं संकट; उरले फक्त काही तास, 15 जिल्ह्यांना हायअलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल