Bhushi Dam : धबधब्यात खडकावर उभा राहिले, काही क्षणात वाढलं पाणी; कुटुंबच वाहून गेलं, चारच दिवसांपूर्वी....
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Lonavala Bhushi Dam : हडपसरमधील अन्सारी कुटुंबिय फिरण्यासाठी गेले असताना धरणाच्या पूर्वेकडे असणाऱ्या धबधब्याच्या प्रवाहात ते उतरले होते. पाणी कमी असताना ते खडकावर गेले. पण अचानक पाणी वाढल्याने अडकले.
advertisement
1/5

भुशी धरणाच्या मागच्या बाजूला असणाऱ्या धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. यापैकी तिघांचे मृतदेह सापडले असून दोघांचा शोध घेतला जात आहे.
advertisement
2/5
<a href="https://news18marathi.com/pune/">हडपसरमधील</a> अन्सारी कुटुंबिय फिरण्यासाठी गेले असताना धरणाच्या पूर्वेकडे असणाऱ्या धबधब्याच्या प्रवाहात ते उतरले होते. पाणी कमी असताना ते खडकावर गेले. पण अचानक पाणी वाढल्याने अडकले.
advertisement
3/5
पावसाचा जोर वाढल्यानं प्रवाहाचा वेगही वाढला आणि सगळेच अडकून पडले. यात नूर अन्सारी, अमिना अन्सारी, मारिया अन्सारी, हुमेदा अन्सारी, अदनान अन्सारी हे वाहून गेले.
advertisement
4/5
अन्सारी कुटुंबात चारच दिवसांपूर्वी लग्नसोहळा पार पडला होता. नवदाम्पत्यसुद्धा यात वाहून गेले होते. मात्र सुदैवाने ते दोघेही वाचले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
advertisement
5/5
सय्यदनगर इथं मौलाना असलेल्या सलमान अन्सारी यांच्या दोन मुली, त्यांची मेहुणी, मेहुणीची मुलगी आणि मेहुण्याचा मुलगा असे पाच जण वाहून गेले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Bhushi Dam : धबधब्यात खडकावर उभा राहिले, काही क्षणात वाढलं पाणी; कुटुंबच वाहून गेलं, चारच दिवसांपूर्वी....