Weather Alert: वारं फिरलं! महाराष्ट्रात आता वातावरण बिघडणार, हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: डिसेंबर अखेर राज्यातील हवामानात मोठ्या बदलांची शक्यता आहे. रविवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/7

राज्यात रविवारी मुख्यतः कोरडे हवामान पहायला मिळेल. तर राज्यातील बहुतांशी भागांत हाडं गोठवणारी थंडी असेल. मराठवाड्याची अंतर्गत भाग, विदर्भ आणि पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात गारठा जास्त राहील. तर उत्तर महाराष्ट्रात देखील थंडीचा कडाका कायम राहणार आहे. रविवारी राज्यातील हवामान कसं असेल? पाहुयात.
advertisement
2/7
राज्यात सर्वदूर थंडीची लाट पहायला मिळत आहे. मुंबई आणि कोकण विभाग वगळता सर्व विभागात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. मुंबईत रविवारी कोरडे हवामान राहील. कमाल तापमान 32 तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
3/7
पुणे जिल्ह्यात थंडीचा जोर अधिक राहील. पुण्यात किमान तापमान 10 अंश सेल्सिअस एवढे राहिल. तर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर मध्ये किमान तापमान 13 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान घसरण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
नाशिकमध्ये गारठा कायम राहील, तर जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये थंडी काहीशी कमी झाल्याचे पहायला मिळेल. अहिल्यानगर मध्ये कडाक्याची थंडी राहणार आहे. नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यात किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यात देखील बोचरी थंडी कायम राहील. छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमान 11 अंश सेल्सिअस तर नांदेड मध्ये 12 अंश सेल्सिअस इतके राहील. मराठवाड्यातील कमाल तापमानात देखील घट झाली आहे. त्यामुळे दुपारी देखील गारवा जाणवत आहे,
advertisement
6/7
विदर्भात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. यामुळे थंडीची लाट निर्माण झाल्याची स्थिती आहे. नागपूरमध्ये 10 तर अमरावतीत 11 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान राहील.
advertisement
7/7
एकंदरीत राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. आगामी चार ते पाच दिवस राज्यातील तापमानात फारसा चढउतार होणार नाहीत. यामुळे गारठा कायम राहील. डिसेंबर अखेर नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: वारं फिरलं! महाराष्ट्रात आता वातावरण बिघडणार, हवामान विभागाचा अलर्ट