TRENDING:

Raigad: जीव गेला तरी वार करत होता, काळ्या जॅकेटवाला 'तो' कोण? मंगेश काळोखेंच्या हत्येचे मन विचलित करणारे PHOTOS

Last Updated:
तरीही मागून आलेल्या दोन मारेकऱ्यांनी वार केले. यामध्ये सगळ्यात शेवटी आलेल्या काळ्या जॅकेटमधील मारेकऱ्याने कुऱ्हाडीने काळोखे यांच्यावर वार करतााना दिसून येत आहे
advertisement
1/10
जीव गेला तरी वार करत होता, काळ्या जॅकेटवाला 'तो' कोण? काळोखेंच्या हत्येचे PHOTOS
नगरपरिषद निवडणुकीनंतर राज्यभरात महापालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला जोरदार तयारी सुरू आहे. अशातच रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. काळोखे यांच्या हत्येचा सीसीटीव्ही समोर आला. यामध्ये ५ मारेकरी दिसत आहे. पण, सगळ्यात शेवटी आलेल्या पाचव्या मारेकऱ्याने काळोखे यांच्या मृत्यूनंतरही वार करत होता.
advertisement
2/10
मंगेश काळोखे  हे खोपोली नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती होते. आपल्या बायकोच्या विजयात त्यांचा सिंहाचाा वाटा होता. मानसी काळोखे यांच्या विजयासाठी काळोखे यांनी खूप मेहनत केली होती. अखेरीस ही मेहनत विजयात बदली. या विजयामुळे शिवसेनेत जल्लोषाचं वातावरण होतं. विजयी रॅलीही काढली होती. पण पुढे काय घडेल याची कल्पना नव्हती.
advertisement
3/10
26 डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी ५ मारेकऱ्यांनी मंगेश काळोखे यांची निर्घृणपणे हत्या केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय की, काळोखे हे जीव वाचवण्यासाठी पळत आहे. पण, अचानक ते खाली कोसळले आणि मारेकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.
advertisement
4/10
मंगेश काळोखे जेव्हा रस्त्यावर पडले तेव्हा आधी तीन मारेकऱ्यांनी त्यांना घेरलं आणि तिघांनी एकापाठोपाठ कोयत्या, तलवार आणि कुऱ्हाडीने सपासप वार सुरू केले.
advertisement
5/10
काळोखे यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर हल्लेखोरांनी सपासप वार केल्याचं दिसतं आहे. जवळपास २४ ते २७ वार हल्लेखोरांनी केले होते.
advertisement
6/10
हा प्रकार सुरू असताना रस्त्यावर येणारी जाणारी लोकही दिसत आहे. पण, कुणाचाही पुढे जाण्याची हिंमत झाली नाही. लोक तिथून पळ काढत होती.
advertisement
7/10
मंगेश काळोखे यांच्यावर तब्बल २७ वार करण्यात आल्याचं दिसून येत आहे. आधी ३ मारेकरी होते. त्यानंतर मागून आणखी २ जण आले होते. मागून आलेल्या दोघांनीही काळोखे यांच्यावर शरिरावर सपासप वार केले.
advertisement
8/10
तब्बल दीड मिनिटं मारेकरी हे मंगेश काळोखे यांच्यावर वार करत होते. तिन्ही मारेकऱ्यांनी डोक्यात आणि चेहऱ्यावर वार केल्यानंतर मंगेश काळोखे यांनी जागेवरच जीव सोडला होता.
advertisement
9/10
तरीही मागून आलेल्या दोन मारेकऱ्यांनी वार केले. यामध्ये सगळ्यात शेवटी आलेल्या काळ्या जॅकेटमधील मारेकऱ्याने कुऱ्हाडीने काळोखे यांच्यावर वार करतााना दिसून येत आहे. काळोखे यांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा तो वार करत होता.
advertisement
10/10
मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ते भरत भगत, रवींद्र देवकर, धनेश देवकर, दर्शन देवकर, सचिन चव्हाण, रवींद्र देवकर यांचा बाऊंसर आणि इतर तीन अनोळखी लोकांविरोधात खोपोली पोलिसात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Raigad: जीव गेला तरी वार करत होता, काळ्या जॅकेटवाला 'तो' कोण? मंगेश काळोखेंच्या हत्येचे मन विचलित करणारे PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल