TRENDING:

Municipal Election : बैठकांवर बैठका तरी भाजप शिवसेनेचं जुळेना, पदाधिकारीही वैतागले,महायुतीचं जागावाटप नेमकं कुठे रखडलं?

Last Updated:

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या रणधुमाळीपूर्वी भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यातील जागावाटपाचा तिढा सुटण्याचे नाव घेत नाहीये. शहरात आतापर्यंत तब्बल नऊ बैठकांचे सत्र पार पडले.मात्र जागांच्या आकड्यांवरून दोन्ही पक्षांमधील रस्सीखेच कायम आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Election 2026
Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Election 2026
advertisement

Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Election 2026 : अविनाश कानडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या रणधुमाळीपूर्वी भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यातील जागावाटपाचा तिढा सुटण्याचे नाव घेत नाहीये. शहरात आतापर्यंत तब्बल नऊ बैठकांचे सत्र पार पडले.मात्र जागांच्या आकड्यांवरून दोन्ही पक्षांमधील रस्सीखेच कायम आहे. यामुळे युती होणार की तुटणार?याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.दरम्यान महायुतीचं हे जागावाटप नेमकं कुठे रखडलं आहे? हे जाणून घेऊयात.

advertisement

महानगरपालिका निवडणुकीची उमेदवारी भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक राहिले असतानाच छत्रपती संभाजीनगरमधील भाजप-शिवसेना युतीबाबत तोडगा काही निघत नाही.दोन्ही पक्षाच्या मंत्र्यांपासून तर स्थानिक पदाधिकारी बैठकांवर बैठका घेत आहे.पण आकड्यांवरून एकमत काही होत नाही.

युतीत दोन्ही पक्षांना 88 जागा लढवायच्या आहेत.हॉटेल ऑरसपासून ते नेत्यांच्या खासगी निवासस्थानांपर्यंत बैठकांचा फेरा सुरू आहे. त्यात पहिल्या बैठकीत भाजपने 78 जागांची मागणी केली होती.त्यानंतर दुसऱ्या -तिसऱ्या बैठकीत हा आकडा 68वर आला.मात्र, शिवसेना 65 जागांवर ठाम होती.त्यानंतर सहाव्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवरून वाद झाला होता.आठव्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांच्यात चर्चा झाली, पण तिथेही 30 जागांच्या प्रस्तावावरून चर्चा फिस्कटली होती. त्यानंतर 9 व्या बैठकीतही तिढा कायम राहिल्याने आता चेंडू वरिष्ठ नेत्यांच्या दरबारी गेला आहे.

advertisement

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाली पाहिजे असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या स्थानिक नेत्यांना दिले आहे. पण दोन्ही पक्षातील स्थानिक नेते आपणच मोठा भाऊ असल्याचे सांगत अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी एकमेकांवर दबाव आणत आहे. विशेष म्हणजे युती न झाल्यास दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी देखील केली आहे. पण खरंच जागावाटप तिढा सुटत नाही की बंडखोरी होऊ नयेत म्हणून दोन्ही पक्षाचा प्लॅन आहे यावरून इच्छुकांमध्ये संभ्रम आहे हे मात्र नक्की.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शनिवारी डाळिंबाला उच्चांकी भाव, शेवग्याचं मार्केट हाललं, गुळाचे दर काय?
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Municipal Election : बैठकांवर बैठका तरी भाजप शिवसेनेचं जुळेना, पदाधिकारीही वैतागले,महायुतीचं जागावाटप नेमकं कुठे रखडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल