Weather Alert: महाराष्ट्रात हवा बिघडली, सोमवारी नवं संकट, हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात गेल्या 4 दिवसांत मोठे बदल जाणवत आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातील 5 डिसेंबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/8

हवामानात होणार बदल
advertisement
2/8
नव्या वर्षात राज्यातील हवामानात अचानक मोठे बदल झाले. मुंबई शहरासह उपनगरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर ढगाळ हवामान कायम असून कुठं थंडी तर कुठं अवकाळी संकट अशी स्थिती आहे. सोमवारी, 5 जानेवारी रोजी मुंबईसह महाराष्ट्रातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
3/8
मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या धुक्यासह ढगाळ हवामान असेल. गारठा कमी झाल्याचे जाणवेल. किमान तापमान 19 तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील. पुढील काही दिवसांत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये देखील याच प्रकरे हवामान राहिल.
advertisement
4/8
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे अहिल्यानगरमध्ये सकाळी दाट धुके आणि त्यांनंतर निरभ्र आकाश राहील. किमान तापमान 12 अंश सेल्सिअस तर तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
5/8
ढगाळ हवामान आणि धुक्यामुळे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील किमान तापमानात वाढ होऊन गारठा कमी झाला आहे. पुण्यात सोमवारी धुके आणि थंडी राहील. कमाल तापमान 29 तर किमान 16 अंश सेल्सिअस राहिल. सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात देखील हवामानात गारठा कायम आहे.
advertisement
6/8
मराठवाड्यात सोमवारी देखील ढगाळ हवामान कायम राहील. यानंतर मात्र आकाश स्वच्छ होईल आणि गारठ्यात वाढ होईल. 5 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर मध्ये कमाल तापमान 29 अंश तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
7/8
विदर्भात स्वच्छ आणि कोरडे हवामान राहील. ढगाळ हवामान निवळणार असून थंडीत वाढ होणार आहे. अमरावतीत किमान तापमान 14 अंश सेल्सिअस तर कमाल 30 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
8/8
एकंदरीत, ढगाळ वातावरणामुळे कमी झालेली राज्यातील थंडी सोमवार नंतर वाढणार आहे. परंतु, सोमवारी राज्यातील बहुतांश भागात धुके आणि ढगाळ वातावरण राहील. बदलत्या हवामानामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: महाराष्ट्रात हवा बिघडली, सोमवारी नवं संकट, हवामान विभागाचा अलर्ट