पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात कायमच परळी हा मुद्दा राहिला आहे. परळी हा भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे मात्र, धनंजय मुंडे एनसीपीत दाखल झाल्यापासून एनसीपीची ताकद वाढली. आता दोन्ही भाऊ बहीण एकत्र आल्यानंतर एकत्र निवडणुका लढवल्या. मधल्या काळात परळीचा खरा राजकीय वारसा कुणाकडे द्यायचा, खरा वारसदार कोण? याची बीडच नाही तर राज्यात मोठी चर्चा सुरू होती. यावरून राजकारण देखील तापले होते. अखेर आता पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संभ्रम दूर झाला आहे. परळीवर प्रेम धनुभाऊला करू द्या, परळी धनु भाऊला देऊन टाकली, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी भरसभेत केले आहे.
advertisement
नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
परळीवर प्रेम धनुभाऊला करू द्या, परळी धनुभाऊला देऊन टाकली आहे... आता मला माळाकोळीवर प्रेम करू द्या. त्यांना म्हणलं त्यांचा मतदारसंघ तुम्ही प्रेम करा, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले. नांदेड जिल्हयातील लोहा तालुक्यातील येथे त्यांनी हे वक्तव्य केले . स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मी परळी धनुभाऊंना देऊन टाकली… आता परळी धनंजय मुंडे सांभाळतात… मी परळी इतकेच माळाकोळीवर प्रेम करते. मी आता माळाकोळी सांभाळणार.. परळीवरचे प्रेम धनुभाऊंना करू द्या… मी त्यांना परळी देऊन टाकली. आता मला माळाकोळीवर प्रेम करू द्या… मी त्यांना म्हटले तुमचा मतदार संघ आहे तुम्ही प्रेम करा. मी आता माळाकोळीवर प्रेम करते.
