TRENDING:

सोयाबीनचे दर पुन्हा वाढले, कापूस आणि तुरीला आज काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा

Last Updated:

7 जानेवारी रोज बुधवारला राज्यातील कृषी मार्केटमध्ये शेतमालाच्या दरांमध्ये चढ-उतारासह काही प्रमुख पिकांच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : 7 जानेवारी, रोज बुधवारला राज्यातील कृषी मार्केटमध्ये शेतमालाच्या दरांमध्ये चढ-उतारासह काही प्रमुख पिकांच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. कांदा, सोयाबीन आणि तूर या महत्त्वाच्या शेतमालाला आज समाधानकारक बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण होण्याची शक्यता आहे. मंगळवारी मिळालेल्या दरांच्या तुलनेत आज या तिन्ही पिकांच्या दरात वाढ दिसून येत असून, काही बाजारपेठांमध्ये उच्चांकी दरांची नोंद झाली आहे.
advertisement

कपाशीच्या दरात किंचित घट

कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये कपाशीची एकूण आवक 22 हजार 467 क्विंटल इतकी झाली. 7 हजार 030 क्विंटल सर्वाधिक आवक ही वर्धा मार्केटमध्ये झाली. त्याठिकाणी कमीतकमी 7546 ते जास्तीत जास्त 8028 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. वर्धा मार्केटमध्ये आज कपाशीला सर्वाधिक बाजारभाव मिळाल्याची नोंद आहे. मंगळवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कपाशीच्या दरात किंचित घट झाली आहे.

advertisement

भुईमूग पीक येईल जोमात, भरघोस उत्पादन वाढीसाठी अशी घ्या काळजी, कृषी तज्ज्ञांचा सल्ला

कांद्याच्या दरात देखील वाढ

आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये 1 लाख 78 हजार 253 क्विंटल कांद्याची आवक झाली. यातील अहिल्यानगर मार्केटमध्ये 63 हजार 073 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. त्याठिकाणी कांद्याला कमीतकमी 433 ते जास्तीत जास्त 1871 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या कांद्याला सर्वाधिक 2800 रुपये बाजारभाव मिळाला. मंगळवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात काहीशी वाढ झालेली दिसून येत आहे.

advertisement

सोयाबीनचे दर सुधारले

आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 49 हजार 471 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज सोयाबीनची 9 हजार 300 क्विंटल सर्वाधिक आवक वाशिम मार्केटमध्ये झाली. त्याठिकाणी सोयाबीनला कमीत कमी 4325 ते जास्तीत जास्त 5005 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. पिवळ्या सोयाबीनला 6700 रुपये सर्वाधिक बाजारभाव वाशिम मार्केटमध्ये मिळाला. मंगळवारी मिळालेल्या सर्वाधिक दरात आज लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे.

advertisement

तुरीच्या दरात वाढ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांच्या पदरी निराशा, सोयाबीन दर घसरले,तूर आणि कांद्याला काय मिळाला भाव?
सर्व पहा

आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 17 हजार 204 क्विंटल तुरीची आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये 5 हजार 169 क्विंटल पांढऱ्या तुरीची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. त्याठिकाणी तुरीला 5400 ते 7525 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आलेल्या 6 क्विंटल काळ्या तुरीला 9150 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाला. मंगळवारी मिळालेल्या दराच्या तुलनेत आज तुरीच्या सर्वाधिक दरात विक्रमी वाढ झाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
सोयाबीनचे दर पुन्हा वाढले, कापूस आणि तुरीला आज काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल