TRENDING:

शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा, सोयाबीन दर घसरले, तूर आणि कांद्याला काय मिळाला भाव?

Last Updated:

8 जानेवारी गुरुवार रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये प्रमुख शेतमालाच्या दरात घसरण दिसून आली. कपाशीच्या दरात किरकोळ वाढ नोंदवली गेली असली तरी कांदा, सोयाबीन आणि तुरीच्या दरांमध्ये घसरण दिसून आली आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : 8 जानेवारी गुरुवार रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये प्रमुख शेतमालाच्या दरात घसरण दिसून आली. कपाशीच्या दरात किरकोळ वाढ नोंदवली गेली असली तरी कांदा, सोयाबीन आणि तुरीच्या दरांमध्ये घसरण दिसून आली आहे. काही शेतमालाची वाढती आवक, मागणीतील चढ-उतार आणि बाजारातील स्थिती यांचा परिणाम दरांवर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर त्याचा थेट प्रभाव जाणवत आहे. पाहुयात, आज प्रमुख शेतमालाची आवक किती झाली? भाव किती मिळाला.
advertisement

कपाशीच्या दरात किंचित वाढ

कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये कपाशीची एकूण आवक 13 हजार 055 क्विंटल इतकी नोंदविण्यात आली. 2 हजार 139 क्विंटल सर्वाधिक आवक जालना मार्केटमध्ये झाली. त्याठिकाणी कमीतकमी 7690 ते जास्तीत जास्त 8010 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. वर्धा मार्केटमध्ये आज कपाशीला सर्वाधिक 8035 रुपये बाजारभाव मिळाला. बुधवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कपाशीच्या दरात किंचित वाढ झाली आहे.

advertisement

Weather Alert : महाराष्ट्र आता पुन्हा बर्फासारखा गारठणार, या जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट

कांद्याचीही घसरण

आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये 2 लाख 34 हजार 781 क्विंटल कांद्याची आवक झाली. यातील नाशिक मार्केटमध्ये 83 हजार 825 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. त्याठिकाणी कांद्याला कमीतकमी 454 ते जास्तीत जास्त 1734 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. पुणे चिंचवड आणि सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या कांद्याला सर्वाधिक 2300 रुपये बाजारभाव मिळाला. बुधवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात घट झालेली दिसून येत आहे.

advertisement

सोयाबीनचे दर पुन्हा घसरले

आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 56 हजार 141 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज सोयाबीनची 12 हजार 998 क्विंटल सर्वाधिक आवक लातूर मार्केटमध्ये झाली. त्याठिकाणी सोयाबीनला कमीतकमी 4193 ते जास्तीत जास्त 5012 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. पिवळ्या सोयाबीनला 5813 रुपये सर्वाधिक बाजार भाव वाशिम मार्केटमध्ये मिळाला. गुरुवारी मिळालेल्या सर्वाधिक दरात आज पुन्हा घट झालेली दिसून येत आहे.

advertisement

तुरीच्या दरात पुन्हा घट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
संक्रांतीच्या काळात लहान मुलांना बोरन्हाण का घालतात?तुम्हाला माहितीये का परंपरा?
सर्व पहा

आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 22 हजार 581 क्विंटल तुरीची आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये 5 हजार 060 क्विंटल पांढऱ्या तुरीची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. त्याठिकाणी तुरीला 5000 ते 7588 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच बीड मार्केटमध्ये आलेल्या 2 क्विंटल काळ्या तुरीला 8690 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजार भाव मिळाला. बुधवारी मिळालेल्या दराच्या तुलनेत आज तुरीच्या सर्वाधिक दरात पुन्हा घट झाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा, सोयाबीन दर घसरले, तूर आणि कांद्याला काय मिळाला भाव?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल