हुराड्याला मिळतोय सुक्यामेवाचा दर, किलोला मोजावे लागतायत तब्बल एवढे रुपये, कारण काय? Video
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
यामुळे हुरड्याला चक्क सुक्या मेव्याचा भाव मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. जालना शहरामध्ये तुरळक ठिकाणी हुरडा विक्रीस आलेला पाहायला मिळतो.
जालना : झणझणीत असा गावरान हुरडा ही मराठवाड्याची खरी ओळख. परंतु यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतामधील हुरडा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे हुरड्याला चक्क सुक्या मेव्याचा भाव मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. जालना शहरामध्ये तुरळक ठिकाणी हुरडा विक्रीस आलेला पाहायला मिळतो. या हुरड्याला 400 रुपये प्रति किलो असा विक्रमी दर मिळत आहे. भाव विक्रमी पातळीवर पोहोचलेले असल्याने केवळ चोखंदळ ग्राहकच हुरड्याची खरेदी करत आहेत.
दरवर्षी वेगवेगळ्या हुरड्याच्या वाणांची लागवड शेतकरी शेतामध्ये करतात आणि मोठ्या प्रमाणावर हुरड्याचं उत्पादन घेतात. यंदा देखील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गुळभेंडीसह अनेक हुरड्याच्या वाणांची लागवड केली होती. परंतु सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे हुरडा पिकाचे प्रचंड नुकसान झालं. यामुळेच बाजारामध्ये अतिशय अल्प प्रमाणात हुरडा उपलब्धता आहे. वाढलेली मागणी आणि घटलेली आवक यामुळे भावात तेजी आहे.
advertisement
किरकोळ बाजारात हुरडा 400 रुपये प्रति किलो या भावाने विक्री होतोय. तर ठोक बाजारात 300 ते 350 रुपये प्रति किलो असा दर मिळतोय, असं शेतकरी जनार्धन गिराम यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.
advertisement
दरम्यान हुरड्याला कृषी पर्यटन केंद्रे आणि हॉटेल व्यवसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. परंतु आवक कमी असल्याने बाजारात हुरडा मिळणे दुरापास्त झालाय. जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरात दहा ते पंधरा हुरडा विक्रेते दरवर्षी हुरडा विक्रीसाठी येत असत. परंतु यंदा हीच संख्या केवळ दोन ते तीन विक्रेत्यांवर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे झणझणीत असा हुरडा खायचा असेल तर जास्त किंमत मोजण्याची तयारी ग्राहकांना ठेवावी लागणार आहे अन्यथा यंदा तरी हुरड्याची चव ग्राहकांना चाखता येणार नाही.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 4:20 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
हुराड्याला मिळतोय सुक्यामेवाचा दर, किलोला मोजावे लागतायत तब्बल एवढे रुपये, कारण काय? Video







