Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं, ना थंडी, ना पाऊस, सोमवारी हवामान विभागाचा वेगळाच अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात 9 फेब्रुवारी रोजी मोठे बदल जाणवणार आहेत. कोकण ते विदर्भ हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/7

आजचं हवामान</a> अपडेट जाणून घेऊ. " width="2560" height="1920" /> महाराष्ट्रातील हवामानात फेब्रुवारी महिन्यात सातत्याने बदल जाणवत आहेत. 9 फेब्रुवारी रोजी राज्यातील हवामान मुख्यतः कोरडे ते हलके ढगाळ आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. सोमवारी पावसाची कोणतीही शक्यता नाही. थंडी कमी होत असून, कमाल तापमान सामान्यपेक्षा थोडे जास्त राहील. तर किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर राहील, कोकण विभागात कमाल तापमान 27-30 अंश सेल्सिअस आणि किमान 23-25 अंश सेल्सिअस राहील. आकाश मुख्यतः निरभ्र किंवा हलके ढगाळ असेल. सकाळी हलकी धूसरता किंवा धुके जाणवू शकते, तर दुपारी उष्ण आणि उबदार वाटेल. समुद्रकिनारी आद्राता राहील, पण पावसाची शक्यता नाही.
advertisement
3/7
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर मध्ये कमाल 28-32 अंश सेल्सिअस आणि किमान 15-19 अंश सेल्सिअस असेल. दिवसभर सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान राहील, सकाळी थोडी थंडी तर दुपारी उकाडा जाणवेल.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रात कमाल 28-31 अंश सेल्सिअस आणि किमान 14-18 अंश सेल्सिअस राहील. हवामान कोरडे आणि स्वच्छ असेल, तर काही ठिकाणी हलके ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यात थंडीचा जोर ओसरत असून उन्हाचा चटका वाढला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात कमाल 29-32 अंश आणि किमान 15-19 अंश सेल्सिअस असेल. उष्ण दिवस, रात्री थंडी राहील.
advertisement
6/7
विदर्भातील हवामानात देखील मोठे बदल जाणत आहेत. नागपूरसह सर्वच जिल्ह्यांत कमाल 30-33 अंश ते किमान 16-20 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. उष्ण आणि कोरडे वातावरण, रात्री थोडी थंडी जाणवेल.
advertisement
7/7
एकंदरीत, पुढील 7 दिवसांत राज्यात पाऊस नाही आणि तापमानात मोठा बदल नाही. किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे थंडी आणखी कमी होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं, ना थंडी, ना पाऊस, सोमवारी हवामान विभागाचा वेगळाच अलर्ट