Weather Alert: महाराष्ट्राची अजून सुटकाच नाहीच! येतंय नवं संकट, 14 फेब्रुवारीला अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 14 फेब्रुवारी रोजी कोकण ते विदर्भ राज्यातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/7

महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही काळापासून सातत्याने बदल होत आहेत. फेब्रुवारीमध्ये उन्हाचा कडाका वाढत आहेत. 14 फेब्रुवारी रोजी देखील राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाची कोणतीही शक्यता नाही, तर किनारपट्टीवर उष्ण आणि दमट स्थिती जाणवेल. शनिवारचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सह कोकणात उष्ण आणि दमट हवामान असणार आहे. मुंबईत कमाल तापमान 29-30 अंश सेल्सिअस तर किमान 24-25 अंश राहील. हवामान विभागाने कोकण आणि गोव्यात 14 आणि 15 फेब्रुवारीला 'हॉट अँड ह्युमिड' स्थितीचा इशारा दिला आहे. सकाळी हलके धुके असेल, समुद्रकिनारी वारे मध्यम ते तीव्र राहतील, ज्यामुळे उकाडा अधिक जाणवेल
advertisement
3/7
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे सुसह्य ते उष्ण हवामान अपेक्षित आहे. पुणे आणि परिसरात कमाल 31-32 अंश तर किमान 15-17 अंश राहील. सकाळी हलका थंडावा जाणवेल, पण दुपारनंतर उष्णता वाढेल. कोल्हापूर, सांगली भागात तापमान 32 अंशांपर्यंत जाऊ शकते. ढगाळपणा कमी असून, आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता जास्त आहे. शेतकऱ्यांसाठी रब्बी पिकांना अनुकूल दिवस आहेत.
advertisement
4/7
नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार सह उत्तर महाराष्ट्रात दिवस उष्ण आणि रात्री थंड राहील. नाशिकमध्ये कमाल 30-32 अंश तर किमान 15-18 अंश अपेक्षित. खानदेश भागात तापमान 32-34 अंशांपर्यंत पोहोचू शकते. हलका ढगाळपणा किंवा तुरळक ठिकाणी धुके असू शकते, पण पाऊस नाही. उन्हाचा तडाखा जाणवेल.
advertisement
5/7
छत्रपती संभाजीनगर , जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड सह मराठवाड्यात उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल तापमान 31-33 अंश तर किमान 16-19 अंश राहण्याची शक्यता.छत्रपती संभाजीनगर मध्ये 32 अंशांपर्यंत तापमान जाईल. सकाळी हलके धुके जाणवू शकते, पण दिवसभर तेजस्वी सूर्यप्रकाश राहील.
advertisement
6/7
नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली सह विदर्भात सर्वाधिक उष्णता जाणवेल. कमाल तापमान 32-34 अंश तर किमान 18-22 अंश अपेक्षित. नागपूरमध्ये 33-43 अंशांपर्यंत पोहोचू शकते. कोरडी आणि उष्ण हवा असून, पावसाची शक्यता नाही. दुपारनंतर उकाडा वाढेल, तर रात्री थोडी थंडावा मिळेल.
advertisement
7/7
एकंदरीत, राज्यात 14 फेब्रुवारीला पावसाळी हवामान नसून, उष्णता आणि दमटपणा वाढत आहे. हवामान विभागानुसार, पुढील काही दिवसांत तापमानात 2-3 अंशांची वाढ होऊ शकते. नागरिकांनी उन्हापासून संरक्षण, पुरेसे पाणी पिणे आणि हायड्रेशनची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी पिकांच्या पाण्याची व्यवस्था करावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: महाराष्ट्राची अजून सुटकाच नाहीच! येतंय नवं संकट, 14 फेब्रुवारीला अलर्ट