TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे 2 दिवस धोक्याचे, 27 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. शनिवारसाठी राज्यातील तब्बल 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर उर्वरित सर्व 27 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/7
महाराष्ट्रासाठी पुढचे 2 दिवस धोक्याचे, 27 जिल्ह्यांना अलर्ट
पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. शनिवारसाठी राज्यातील तब्बल 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर उर्वरित सर्व 27 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असा सर्वदूर हा पाऊस पडणार आहे. पाहुयात 27 सप्टेंबर रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
2/7
कोकणातील मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर पालघरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाश राहणार असून अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागांना ऑरेंज अलर्ट तर उर्वरित सर्व पाचही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी विजांसह आणि 30 ते 40 किमी वेगाने वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/7
तर मराठवाड्यात लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड या पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
6/7
विदर्भात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी 30 ते 40 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
7/7
दरम्यान, मागील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाने उसंत घेतल्याचे पाहायला मिळाले. परंतु 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची, जनावरांची आणि जिविताची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे 2 दिवस धोक्याचे, 27 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल