Weather Alert : महाराष्ट्रात आता पाऊस बरसणार, 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाचा असेल. यावेळी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. 17 मार्चचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/7

महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 17 मार्च रोजी उष्ण आणि दमट हवामान कायम राहील. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाचा असेल. यावेळी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. 17 मार्चचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील. मुंबईत कमाल तापमान 32-36 अंश सेल्सियस तर किमान 24-27 अंश राहील. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये कोरडे आणि उष्ण राहील. पुण्यात कमाल तापमान 33-36 अंश तर किमान 18-21 अंश राहील. 16 मार्चला सोलापूर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार तापमान वाढ पाहायला मिळेल. नाशिकमध्ये कमाल तापमान 32-35 अंश तर 19-22 अंश राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल तापमान 33-37 अंश तर किमान 20-23 अंश राहील. नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
6/7
विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणामध्ये उष्ण हवामान कायम असेल. नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होईल.
advertisement
7/7
दरम्यान, राज्यात 17 मार्चला मुख्यतः कोरडे आणि उष्ण हवामान राहील. तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे. तर काही भागात वादळी पावसाची शक्यता आहे.