TRENDING:

Car: उन्हात किती वेळ बाईकवर फिरणार? लेकरांसाठी घ्या 33 किमी मायलेज अन् बाईकच्या किंमतीतली Car!

Last Updated:
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे, उन्हामध्ये प्रवास करणे म्हणजे, असह्य झालं आहे. त्यात जर बाईक किंवा स्कुटीवर प्रवास करायचा असेल तर विचारायचं काम नाही. अशावेळी एखादी कार आपल्याकडे पाहिजे राव, असा प्रत्येक जण विचार करत असतो. पण, आता हा विचार सत्यात आणण्याची वेळ आली आहे. कारण, मार्केटमध्ये अशा काही स्वस्त कार आहे, जे एखाद्या बाईकच्या किंमतीत सहज येतील. यामध्ये २ अशा कार आहे, ज्या बजेट फ्रेंडली आहे.
advertisement
1/11
Car: उन्हात किती वेळ बाईकवर फिरणार? लेकरांसाठी घ्या 33 किमी मायलेज अन् बाईकच्या किंमतीतली Car!
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे, उन्हामध्ये प्रवास करणे म्हणजे, असह्य झालं आहे. त्यात जर बाईक किंवा स्कुटीवर प्रवास करायचा असेल तर विचारायचं काम नाही. अशावेळी एखादी कार आपल्याकडे पाहिजे राव, असा प्रत्येक जण विचार करत असतो. पण, आता हा विचार सत्यात आणण्याची वेळ आली आहे. कारण, मार्केटमध्ये अशा काही स्वस्त कार आहे, जे एखाद्या बाईकच्या किंमतीत सहज येतील. यामध्ये २ अशा कार आहे, ज्या बजेट फ्रेंडली आहे.
advertisement
2/11
Maruti Alto K10 - भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेली मारुती सुझुकीची Maruti Alto K10 ही सगळ्यात स्वस्त आणि एकेकाळी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली होती. आताही या कारची विक्रीही सर्वाधिक आहे. मध्यमवर्गीय कुटुंबीयांची ऑल टाईम फेव्हरेट ही कार ठरली आहे.
advertisement
3/11
Maruti Alto K10 मध्ये ९९८ सीसीचं के सीरिज १ लिटर पेट्रोल इंजिन दिलं आहे. जे ६६.६२ बीएचपी इतकी पॉवर जनरेट करतो.  ही कार ५-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी पर्यायांसह येते. तसंच, Maruti Alto K10 चा फॅक्टरी-फिटेड सीएनजी प्रकारात सुद्धा उपलब्ध आहे.
advertisement
4/11
Alto k10 च्या मायलेजबद्दल बोलायचं झालं तर, Alto k10 ही पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल व्हेरियंटमध्ये २४.३९ किमी मायलेज देते. तर सीएनजी मॅन्युअल व्हेरियंटमध्ये तब्बल ३३.८५ किमी इतकं देणारी सगळ्यात  कमी किंमतीतली कार आहे.
advertisement
5/11
सुरक्षेसाठी आता  Alto k10 मध्ये  ६ एअर बॅग्स दिल्या जात आहे. ६ एअरबॅग्ज (फ्रंट + साइड + कर्टन एअरबॅग्ज), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), सर्व प्रवाशांसाठी ३-पॉइंट सीट बेल्ट, मागील पार्किंग सेन्सर्स आणि सामान ठेवण्यासाठी क्रॉसबार असे फिचर्स दिले आहेत.
advertisement
6/11
मारुती सुझुकीच्या कारसाठी SBI, HDFC Bank आणि ICICI Bank सारख्या बँकांकडून 8% ते 10% टक्क्याची ऑफर आहे. मध्यल्या काळात कंपनीने १९९९ रुपये ईएमआय ऑफर सुद्धा दिली होती. जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे या कारची सुरुवातीच एक्स-शोरूम ३.९९ लाख रुपयांपासून सुरू होते.
advertisement
7/11
Maruti Suzuki S-Presso : मारुतीची आणखी एक बजेट फ्रेंडली कार म्हणून Maruti Suzuki S-Presso कडे पाहिलं जातं. कारण, या कारचा लूक थोडा वेगळा असला तरी तुम्हाला छोट्या एसयुव्हीची मजा या कारमध्ये येईल. या कारची किंमत फक्त एक्स शोरूम किंमत आता 3,49, 900 पासून सुरू होते. मारुतीची ही सगळ्यात स्वस्त कार आहे.
advertisement
8/11
Maruti Suzuki S-Presso मध्ये एकूण  Std, LXi, VXi (O) आणि VXi+(O) असे ४ व्हेरियंट आहेत  याच्या LXi आणि VXi ट्रिम्समध्ये CNG किटचा ऑप्शन दिला आहे.
advertisement
9/11
Maruti Suzuki S-Presso मध्ये १ लिटरचं पेट्रोल इंजिन दिलं आहे जे अल्टो के १० मध्ये सुद्धा आहे. हे इंजिन 68 बीएचपीची पॉवर आणि 90 एनएमचं टॉर्क जनरेट करते. इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा ऑप्शन दिला आहे. Maruti Suzuki S-Presso चं पेट्रोलमध्ये  25 किमी इतका मायलेज देते तर सीएनजी व्हेरिएंटमध्ये 32.73 किमी इतकं मायलेज देते.
advertisement
10/11
Maruti Suzuki S-Presso मध्ये एप्पल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह 7- इंचांची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, समोर पावर्ड विंडो आणि कीलेस एंट्रीसारखे फीचर्स मिळतात. सुरक्षेच्या हिशोबाने यामध्ये आता ६ एअरबॅग, रियर पार्किंग सेन्सर, ईबीडीसह एबीएससारखे फीचर्स देण्यात आले आहेत.  ही एक आयडल सिटी कार आहे.
advertisement
11/11
आता उन्हाळ्याचा विचार केला तर दोन्हा गाड्यांमध्ये पॉवरफुल एसी सिस्टीम दिली आहे. पण, Maruti Suzuki S-Presso चं केबिन थोडं उंच आहे, तर अल्टो के १० चं केबिन हे कमी उंचीचं आहे. त्यामुळे अल्टो के १० ही वेगाने कुलिंग होते. तर Maruti Suzuki S-Presso मात्र थोडा वेळ लागतो.  दोन्ही गाड्यांमध्ये मॅन्युअल एसी विथ हिटरचं फिचर्स दिले आहे.  त्यामुळे उन्हाळ्यात कारचा प्लॅन असेल तर दोन्ही गाड्या बेस्ट आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Car: उन्हात किती वेळ बाईकवर फिरणार? लेकरांसाठी घ्या 33 किमी मायलेज अन् बाईकच्या किंमतीतली Car!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल