TRENDING:

VIDEO : तापाने फणफणलेला, धड उभंही राहता येत नव्हतं,तरी वानखेडेवर उतरलेला टीम इंडियाचा स्टार, खेळाडुने सांगितला भयानक अनुभव

Last Updated:

टीम इंडियाचा स्टार खेळाडू तापाने फणफणलेला त्याला धड उभंही राहता येत नव्हतं, तरी देखील तो वानखेडेच्या मैदानावर उतरला होता.त्यामुळे हा खेळाडू कोण होता? आणि अशा अवस्थेत तो मैदानात कसा उतरला होता? हे जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Abhishek Sharma Sanju Samson :टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी20 वर्ल्डकप जिंकला आहे.या विजयाला आता जवळपास आठवडा उलट आला आहे.तरी विजयी जल्लोष अजून सूरूच आहे.कारण कॅप्टन सूर्यकुमार यादव विविद देवस्थानी ट्रॉफीला घेऊन फिरताना दिसत आहे. आज सूर्या ट्रॉफीसह दादरच्या सिद्धीविनायक मंदिरात पोहोचला होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला होता.या दरम्यान आता एक मोठी गोष्ट समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू तापाने फणफणलेला त्याला धड उभंही राहता येत नव्हतं, तरी देखील तो वानखेडेच्या मैदानावर उतरला होता.त्यामुळे हा खेळाडू कोण होता? आणि अशा अवस्थेत तो मैदानात कसा उतरला होता? हे जाणून घेऊयात.
abhishek sharma sanju samson
abhishek sharma sanju samson
advertisement

खरं तर भारताचा पहिवाच सामना हा मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर होता. या सामन्याआधी टीम इंडिया प्रचंड चिंतेत होती.कारण टीम इंडियाचा मॅच विनर खेळाडू अभिषेक शर्मा हा तापाने फणफणलेला. वानखेडेच्या ड्रेसिंग रूममध्ये तो स्वेटर घालून बसला होता.त्याला असे स्वेटर घातलेले पाहून सगळेचे चिंतेत होते, असं सेजू सॅमसनने सांगितले आहे.

मला (अभिषेकला) त्यावेळी सगळ्या सिनिअर खेळाडूंनी सांगितलं की जर तु बरं वाटत नसेल तर एका सामन्यात ब्रेक घेऊन दुसऱ्या सामन्यात खेळ असे अनेकांनी सांगितले होते,असे अभिेषेक शर्माने सांगितले होते. त्यावेळी मला साधं उभा राहता येत नव्हतं. मी संजू भाईला विचारलं काय करू संजू म्हणाला तु खेळ.त्यानंतर मी हिम्मत दाखवली आणि गोळ्या घेऊन खेळलो.मला माझ्या मनासारखं खेळता आलं नाही पण मला आनंद वाटला की हिम्मत दाखवली असे अभिषेक शर्मा म्हणाला आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव 2026 मध्ये टीम इंडियाचे दोन्ही ओपनर बोलत होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दोनदा अपयश पण जिद्द नाही सोडली, पुण्याच्या आर्याने कंपनी सेक्रेटरी परीक्षेत मिळवलं यश, Video
सर्व पहा

दरम्यान वर्ल्डकपच्य पहिल्याच म्हणजेच युएसए विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला पहिल्याच बॉलला कॅच आऊट झाला होता.त्यानंतर इतर खेळाडूंनी देखील विकेट फेकल्या होत्या.त्यात कॅप्टन सूर्याने 49 बॉलमध्ये 84 धावांची वादळी खेळा केली होती.या खेळीच्या बळावर भारताने 161 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना युएसए 132 धावा करू शकली होती,त्यामुळे भारताने हा सामना 29 धावांनी जिंकला होता.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : तापाने फणफणलेला, धड उभंही राहता येत नव्हतं,तरी वानखेडेवर उतरलेला टीम इंडियाचा स्टार, खेळाडुने सांगितला भयानक अनुभव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल