Soap : साबण संपला की छोटे तुकडे फेकू नका, 'हे' 5 जबरदस्त फायदे; घरातच करा असे 5 स्मार्ट उपयोग
- Published by:Devika Shinde
Last Updated:
थोडी कल्पकता वापरली तर साबणाचे हे छोटे तुकडे केवळ तुमचे पैसेच वाचवत नाहीत, तर कचरा कमी करून पर्यावरणालाही हातभार लावतात. चला तर मग जाणून घेऊया, साबणाच्या या इवल्याशा तुकड्यांचे 'मोठे' उपयोग.
advertisement
1/8

आपल्या प्रत्येकाच्या घरी सकाळी अंघोळ करताना किंवा हात धुताना एक गोष्ट हमखास घडते. साबणाची वडी वापरून वापरून एवढी लहान होते की ती हातात धरणंही कठीण होतं. अशा वेळी "आता याचा काय उपयोग?" असं म्हणून आपण तो तुकडा फेकून देतो किंवा बेसिनच्या कोपऱ्यात तसाच सोडून देतो. पण, तुम्हाला माहितीये का? ज्या तुकड्याला आपण 'कचरा' समजतो, तो तुमच्या घरातील अनेक मोठ्या समस्यांवरचा रामबाण उपाय ठरू शकतो.
advertisement
2/8
थोडी कल्पकता वापरली तर साबणाचे हे छोटे तुकडे केवळ तुमचे पैसेच वाचवत नाहीत, तर कचरा कमी करून पर्यावरणालाही हातभार लावतात. चला तर मग जाणून घेऊया, साबणाच्या या इवल्याशा तुकड्यांचे 'मोठे' उपयोग.
advertisement
3/8
1. अडकलेली चैन आता होईल 'फर्स्ट क्लास'कधी गडबडीत बाहेर निघताना जॅकेटची चैन अडकलीये किंवा महागड्या बॅगची चैन खराब झालीये? अशा वेळी आपण ओढाओढ करतो आणि चैन काही ठिक होत नाही. अशा वेळी साबणाचा एक सुका तुकडा चैनीच्या दातांवर (Teeth) हलक्या हाताने घासा. साबण 'लुब्रिकंट'सारखं काम करतो. दोन-तीन वेळा घासल्यानंतर चैन ओढून पाहा, ती अगदी आरामात सरकेल.
advertisement
4/8
2. कपाटातील दुर्गंधीला म्हणा 'बाय-बाय'पावसाळ्यात किंवा दमट हवेमुळे कपाटात किंवा बुटांच्या रॅक मध्ये एक प्रकारचा कुबट वास येऊ लागतो. हा वास घालवण्यासाठी महागडे 'एअर फ्रेशनर' आणण्याची गरज नाही. साबणाचे काही सुके तुकडे एका पातळ सुती कापडात बांधून कपाटाच्या कोपऱ्यात ठेवा. हा एक नैसर्गिक फ्रेशनर असून तो कपाटातील दुर्गंधी शोषून घेतो आणि कपड्यांना एक फ्रेश सुगंध देतो.
advertisement
5/8
3. टेलरिंग आणि शिवणकामात 'स्मार्ट' मदतजर तुम्हाला शिवणकामाची आवड असेल, तर हा उपाय तुमच्यासाठी बेस्ट आहे. सहसा कापडावर माप टाकण्यासाठी 'मार्कर्स' किंवा खडू वापरला जातो. पण साबणाचा छोटा तुकडा चॉकपेक्षाही चांगलं काम करतो. यामुळे कापडावर स्पष्ट रेषा उमटतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कपडा धुतल्यानंतर हे डाग पूर्णपणे निघून जातात, जे खडूच्या बाबतीत नेहमीच शक्य होत नाही.
advertisement
6/8
4. बागेतील किड्यांवर घरगुती 'पेस्टिसाईड'तुमच्या बागेतील झाडांवर कीड लागली असेल, तर साबणाचे तुकडे कामाला येतात. हे तुकडे पाण्यात विरघळवून त्याचे एक द्रावण तयार करा आणि झाडांच्या पानांवर फवारा. हे एक नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करते. फक्त एक काळजी घ्या, की यासाठी वापरलेला साबण जास्त केमिकलवाला नसावा.
advertisement
7/8
5. बनवा स्वतःचं 'लिक्विड सोप'साबणाचे उरलेले छोटे तुकडे एकत्र करून गरम पाण्यात टाका. हे मिश्रण थोडा वेळ उकळू दिलं की त्याचं छान द्रावण तयार होतं. हे द्रावण थंड झाल्यावर तुम्ही 'हँडवॉश' म्हणून किंवा किचन प्लॅटफॉर्म आणि सिंक साफ करण्यासाठी वापरू शकता. यामुळे नवीन लिक्विड सोप आणण्याचा तुमचा खर्च वाचेल.
advertisement
8/8
'टाकाऊतून टिकाऊ' बनवण्याची ही कला केवळ तुमच्या घराला स्मार्ट बनवत नाही, तर तुमच्या खिशालाही दिलासा देते. त्यामुळे आजपासून साबणाचे तुकडे फेकून न देता, त्याचा असा कल्पक वापर नक्की करून पाहा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Soap : साबण संपला की छोटे तुकडे फेकू नका, 'हे' 5 जबरदस्त फायदे; घरातच करा असे 5 स्मार्ट उपयोग