स्वप्नील कोम्मावर यांनी त्यांच्या काकांबद्दलची एक खरी घटना सांगितली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, 1990 साली त्यांच्या काकांनी प्रत्येकी 15,000 रुपयांप्रमाणे चार एकर जमीन खरेदी केली होती. त्या वेळी एकूण गुंतवणूक फक्त 60,000 रुपये होती. कालांतराने त्या भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आणि ते ठिकाण पुढे जाऊन जिल्हा बनले.
या विकासामुळे त्या जमिनीची किंमत प्रचंड वाढली. नंतर प्रसिद्ध रिटेल कंपनी DMart ने त्या जमिनीपैकी दोन एकर जमीन तब्बल 25 कोटी रुपयांना विकत घेतली. म्हणजेच फक्त 60 हजार रुपयांची गुंतवणूक पुढे जाऊन कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीत बदलली.
advertisement
कोम्मावर यांच्या मते, कधी कधी पैसे कमावण्याचा सर्वात मोठा मंत्र म्हणजे संयम ठेवणे आणि योग्य वेळ येईपर्यंत आपल्या मालमत्तेला धरून ठेवणे. त्यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या काकांनी जमिनीच्या विक्रीतून मिळालेल्या 25 कोटी रुपयांची रक्कम फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवली आहे. या गुंतवणुकीतून त्यांना दरमहा सुमारे 14.5 लाख रुपये व्याज मिळते. विशेष म्हणजे त्यांनी अजूनही उरलेली अर्धी जमीन स्वतःकडे ठेवली आहे.
कधी कधी सर्वात मोठी संपत्ती ही दशकानुदशके योग्य मालमत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यामुळे निर्माण होते, असे कोम्मावर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काही लोकांनी इतक्या मोठ्या परताव्याचे कौतुक केले, तर काहींनी या गुंतवणुकीवर किती कर भरावा लागेल, याबद्दल प्रश्न उपस्थित केले.
एका युझर्स लिहिले, हे खरे आहे. अनेक दशकांपर्यंत समाजवादी धोरणांमुळे अनेक मालमत्तांची किंमत खूपच कमी होती. पण नंतर जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणामुळे जागतिक अर्थव्यवस्था झपाट्याने वाढली आणि मालमत्तेच्या किंमती अनेक पट वाढल्या. पुढील 30 वर्षांत जमिनीच्या किमतीत अशी वाढ पुन्हा होणे कदाचित शक्य नाही.
दुसऱ्या एका युझर्सने म्हटले की होय, भारतातील अनेक लोक अशाच पद्धतीने जीवन जगतात. अनेकांना अर्थव्यवस्थेत सक्रियपणे काम करून योगदान देण्यापेक्षा भाडे किंवा गुंतवणुकीतून उत्पन्न मिळवण्याचीच इच्छा असते. तिसऱ्या व्यक्तीने प्रतिक्रिया देताना म्हटले, ही खरोखरच जबरदस्त कहाणी आहे. स्थानिक विकासामुळे जमिनीची किंमत कशी प्रचंड बदलू शकते, याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.
