TRENDING:

मला ट्रॉमा झाला होता! अक्षय खन्नासोबत काम करणं पडलं होतं भारी, डायरेक्टरनं सांगितला धक्कादायक अनुभव

Last Updated:
धुरंदर सिनेमानंतर अक्षय खन्ना चर्चेत आला आहे.पण कधी काळी अक्षय खन्नाबरोबर काम करून प्रसिद्ध डायरेक्टरला ट्रॉमा झाला होता.
advertisement
1/7
मला ट्रॉमा झाला होता! अक्षय खन्नासोबत काम करणं पडलं होतं भारी, डायरेक्टरनं सांगितला धक्कादायक अनुभव
'धुरंधर' या चित्रपटाने अक्षय खन्ना यांना प्रचंड यश मिळवून दिले. तो सोशल मीडियावर एका रात्रीत प्रसिद्ध झाला. 'धुरंधर' च्या लोकप्रियतेनंतर अक्षय खन्ना दृश्यमच्या सिक्वेलमुळे वादात सापडला. निर्मात्यांनी त्याच्यावर अनेक आरोप केले, त्याला वाईट व्यक्ती देखील म्हटले.
advertisement
2/7
या सर्वांमध्ये फराह खानचे एक विधान चर्चेत आलं आहे. फराह खानने अक्षय खन्नासोबत काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला. अक्षय खन्नाचं नाव ऐकताच मी पळून जायचे असं फराहने सांगितलं. 
advertisement
3/7
फराह खानने रणवीर इलाहाबादियाच्या पॉडकास्टवर अक्षय खन्नासोबत काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला. ती म्हणाली, त्याच्याबरोबर काम करणं अत्यंत कठीण होतं. अक्षय सेटवर एक कठीण व्यक्ती होता. अक्षय त्यावेळी केस गळण्याचा त्रास सहन करत होता. ज्यामुळे तो आणखी चिडचिड करत होता. सेटवर अक्षय खन्ना यांचे वर्तन चांगले नव्हते.
advertisement
4/7
फराह पुढे म्हणाली, मी त्याच्याबरोबर 2-3 सिनेमात काम केलं त्यानंतर मला ट्रॉमा झाला. तो सेटवर एक वेगळाच माणूस होता. तो स्वतःसोबतच असायचा. जेव्हा  कळायचं की अक्षय खन्ना देखील चित्रपटात आहे. तेव्ही मी सांगायचे की माझ्याकडे तारखा नाहीत. 
advertisement
5/7
ती पुढे म्हणाली, "मला वाटते की त्याने स्वतः तिला सांगितले की त्याचे केस गळत आहेत. तो नेहमीच चिडचिड करायचा. तो वस्तू फेकून द्यायचा आणि म्हणायचा, 'हा कसला संवाद आहे?' तो असाच होता."
advertisement
6/7
'दिल चाहता है' मध्ये अक्षय खन्नासोबत काम केलं होतं. ती चित्रपट नाकारू शकली नाही कारण तो तिचा चुलत भाऊ फरहान अख्तरचा चित्रपट होता.
advertisement
7/7
कोरिओग्राफरच्या मते, 'दिल चाहता है' च्या वेळेपर्यंत अक्षय खन्नाने हे सत्य स्वीकारले होते की त्याचे केस गळत आहेत. तो खूप रिलॅक्स झाला होता. त्याचं वागणं खूप बदललं होतं आणि आज दोघांमध्ये खूप चांगलं नातं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मला ट्रॉमा झाला होता! अक्षय खन्नासोबत काम करणं पडलं होतं भारी, डायरेक्टरनं सांगितला धक्कादायक अनुभव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल