TRENDING:

Success Story : गाईच्या शेणाने दिले वर्षाला 50 लाख! सावंत दाम्पत्याची भन्नाट बिझनेस आयडिया!

Last Updated:
अनेक जण व्यवसायाचा मार्ग निवडताना पाहण्यास मिळतात. उपासना सावंत आणि अजित सावंत या दाम्पत्याने निसर्गाशी एकरूप होत स्वतःचा खास व्यवसाय उभारला आहे.
advertisement
1/7
गाईच्या शेणाने दिले वर्षाला 50 लाख! सावंत दाम्पत्याची भन्नाट बिझनेस आयडिया!
आजकाल नोकरी करत असताना किंवा इतरही क्षेत्रात काम करत असताना प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय असावा असं वाटतं. त्यामुळे अनेक जण व्यवसायाचा मार्ग निवडताना पाहण्यास मिळतात. उपासना सावंत आणि अजित सावंत या दाम्पत्याने निसर्गाशी एकरूप होत स्वतःचा खास व्यवसाय उभारला आहे.
advertisement
2/7
त्यांनी दररोजच्या वापरात आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध व्हावेत. यासाठी गाईच्या शेणापासून ऑरगॅनिक अगरबत्ती तयार करण्याचा उपक्रम सुरू केला. यामधून त्यांना लाखांची कमाई होत आहे.
advertisement
3/7
मनोरंजन क्षेत्रात दिग्दर्शनाच्या कामाशी जोडलेले अजित सावंत होते. तर उपासना सावंत एका कॉर्पोरेट कंपनीत कार्यरत होत्या. स्वतःचा व्यवसाय सुरू करावा अशी त्यांची नेहमीच इच्छा होती.
advertisement
4/7
त्यामुळे त्यांनी सुरुवातीला केकचा व्यवसाय केला. पण त्यांना सतत वाटायचे की वेगळं आणि समाजोपयोगी काहीतरी करता यावं, यासाठीही ते सतत प्रयत्नशील होते. अशातच लॉकडाऊन आला आणि ऑरगॅनिक उत्पादनांची वाढती मागणी त्यांनी ओळखली.
advertisement
5/7
त्यामुळे त्यांनी घराघरात रोज लावली जाणारी अगरबत्ती ही आरोग्यास अपायकारक रसायनांमुळे धोकादायक ठरू शकते हे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी गाईच्या शेणापासून अगरबत्ती बनवण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली. यासाठी त्यांनी अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि स्वतःची छोटी फॅक्टरी सुरू केली.
advertisement
6/7
त्यानंतर त्यांनी गाईच्या शेणाचा वापर करून आणि नैसर्गिक सुगंध मिश्रित करून त्यांनी पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी अगरबत्ती बाजारात आणली. सावंत दाम्पत्याचा विश्वास आहे की, जेव्हा आपण निसर्गाला हानी न पोहोचवता काम करतो, तेव्हा निसर्गही आपल्याला साथ देतो.
advertisement
7/7
त्यांच्या उपक्रमामुळे अनेकांना शुद्ध आणि सुरक्षित अगरबत्ती उपलब्ध होत आहे. त्यांच्या या कल्पक प्रयत्नांना मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांचे वार्षिक उत्पन्न जवळपास 50 लाखांपर्यंत पोहोचले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Success Story : गाईच्या शेणाने दिले वर्षाला 50 लाख! सावंत दाम्पत्याची भन्नाट बिझनेस आयडिया!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल