Weather Alert : महाराष्ट्रात आता 'तो' परत येतोय, 7 जिल्ह्यांना झोडपणार, हवामान खात्याचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
Last Updated:
15 मार्च रोजी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील 24 तासांत राज्यात हवामान कसे राहील पाहुयात.
advertisement
1/7

महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. उष्णतेच्या लाटेत राज्यावर अस्मानी संकट घोंघावत आहे. 15 मार्च रोजी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील 24 तासांत राज्यात हवामान कसे राहील पाहुयात.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील. मुंबईत कमाल तापमान 33-37 अंश सेल्सियस तर किमान 24-27 अंश राहील. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये कोरडे आणि उष्ण हवामान राहील. पुण्यात कमाल 34-37 अंश तर किमान 18-21 अंश तापमान राहील. सातारा, सांगली आणि सोलापूरला वादळी वारा आणि विजांसह अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये तापमान वाढ पाहायला मिळेल. नाशिकमध्ये दिवसा 33-36 अंश तर 19 ते 22 अंश तापमान राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल 34-38 अंश तर किमान 20-23 अंश तापमान राहील. बीड आणि धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा उष्णता कायम असेल. अमरावती आणि अकोल्याला उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.
advertisement
7/7
एकंदरीत, 15 मार्चला महाराष्ट्रात उष्णता कायम राहील, पण विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रात आता 'तो' परत येतोय, 7 जिल्ह्यांना झोडपणार, हवामान खात्याचा अलर्ट