TRENDING:

हळद की होळी? अंगावर रंगाचा सडा अन् मस्तीचा राडा! विजय-रश्मिकाच्या हळदीतील रंगारंग PHOTO VIRAL

Last Updated:
Rashmika-Vijay Haldi Ceremony: रश्मिका आणि विजयने त्यांच्या हळदी समारंभाचे काही भन्नाट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना एकच प्रश्न पडलाय, "ही हळद होती की होळी?"
advertisement
1/10
हळद की होळी? विजय-रश्मिकाच्या हळदीतील रंगारंग PHOTO VIRAL
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांच्या शाही विवाहाची चर्चा अजूनही थांबलेली नाही. २६ फेब्रुवारीला उदयपूरमध्ये पार पडलेल्या या ड्रीम वेडींगचे एकेक सुंदर फोटो आता समोर येत आहेत.
advertisement
2/10
आज, सोमवारी रश्मिका आणि विजयने त्यांच्या हळदी समारंभाचे काही अत्यंत भन्नाट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना एकच प्रश्न पडलाय, "ही हळद होती की होळी?"
advertisement
3/10
रश्मिकाने हे फोटो शेअर करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. ती म्हणते, "आमची हळद ही केवळ हळद नव्हती, तर तो हळद आणि होळीचा अनोखा संगम होता. आम्ही रंगात इतके भिजलो होतो की आजही माझ्या केसात थोडासा लाल रंग शिल्लक आहे."
advertisement
4/10
रश्मिकाने मजेत असंही सांगितलं की, त्या दिवशी झालेल्या सर्व खेळांमध्ये तिने विजयला हरवलं. गंमत म्हणजे, खुद्द विजयदेखील त्या दिवशी 'टीम ब्राइड'मध्ये सामील झाला होता.
advertisement
5/10
विजय देवरकोंडाने या सोहळ्यामागचा ड्रामा उलगडून सांगितला. तो म्हणाला, "२४ फेब्रुवारीची संगीत नाईट पहाटेपर्यंत चालली होती. खरंतर सकाळी उठणं अशक्य होतं, पण लग्नाचा उत्साह आणि मित्र-परिवाराला भेटण्याची ओढ इतकी होती की सर्वजण वेळेवर तयार झाले. मला माझ्या हळदीत युद्ध हवं होतं आणि तसंच घडलं. दुपारपर्यंत अनामिका खन्नाने डिझाइन केलेला माझा आवडता कुर्ता रंगांमुळे पूर्णपणे खराब झाला होता, पण ती मजा शब्दांत सांगता येणार नाही!"
advertisement
6/10
विजयला एका अशा मोठ्या पाण्याच्या भांड्यात बसायचं होतं, जिथे त्याचं संपूर्ण गँग एकत्र मावेल. त्याच्या इव्हेंट टीमने ही इच्छा पूर्ण केली. उदयपूरमधील 'मेमेंटोज बाय आयटीसी हॉटेल्स' या २०० एकरमध्ये पसरलेल्या निसर्गरम्य ठिकाणी हा सोहळा पार पडला.
advertisement
7/10
रश्मिका आणि विजय दोघेही या जागेच्या प्रेमात पडले असून, दरवर्षी फेब्रुवारीत सुट्टीसाठी तिथेच जाण्याचा विचार करत असल्याचं विजयने सांगितलं.
advertisement
8/10
२४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान चाललेल्या या तीन दिवसांच्या सोहळ्याला 'विरोश' (Virosh) असं नाव देण्यात आलं होतं.
advertisement
9/10
४ मार्चला हैदराबादमध्ये पार पडलेल्या त्यांच्या ग्रँड रिसेप्शनला अल्लू अर्जुन, राम चरण, क्रिती सेनॉन आणि करण जोहर यांच्यासह सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
advertisement
10/10
आज शेअर केलेल्या हळदीच्या फोटोंनी पुन्हा एकदा या लग्नाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हळद की होळी? अंगावर रंगाचा सडा अन् मस्तीचा राडा! विजय-रश्मिकाच्या हळदीतील रंगारंग PHOTO VIRAL
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल