मावळ : पुण्यातून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना मावळमधून समोर आली आहे. राज्याभरात एकीकडे सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. सिलेंडर नसल्यामुळे लोकांच्या गॅस एजन्सीबाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या आहे. अशातचच गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोनं एका ११ वर्षांच्या चिमुरडीला चिरडल्याची घटना मावळमध्ये घडली आहे. टेम्पो उतारावर मागे आल्यामुळे चिमुरडी गाडी खाली सापडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा इथं ही दुर्दैवी अपघाताची घटना घडली आहे. ज्ञानेश्वरी मुऱ्हे असं ११ वर्षीय मृत मुलीचं नाव आहे. सोमटाणे फाटा परिसरात गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा टेम्पो आला होता. चालकाने टेम्पो रस्त्याच्या बाजूला उभा केला होता.
पण गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा टेम्पो उतारावर उभा करण्यात आला होता. मात्र, चालकाने वाहनाचा हँडब्रेक लावण्यास विसरला. टेम्पोतून खाली उतरल्यानंतर अचानक टेम्पो मागे सरकला. यावेळी जवळच असलेली अकरा वर्षांची ज्ञानेश्वरी मुऱ्हे या मुलीला टेम्पोचा धक्का लागला आणि ज्ञानेश्वरी खाली पडली. जशी ती खाली पडली आणि टेम्पोच्या चाकाखाली सापडली.
टेम्पोमध्ये आधीच सिलेंडर भरलेले होते, टेम्पो जसा मागे सरकला, ज्ञानेश्वरी मुऱ्हे ही टेम्पोच्या चाकाखाली सापडली. चाकाखाली सापडल्यामुळे चिमुरडी ज्ञानेश्वरीचा मृत्यू झाला. स्थानिकांनी धाव घेऊन तिला तातडीने बाहेर काढलं. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि तळेगांव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे सोमाटणे फाटा परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
