TRENDING:

iQOOचा भारी बॅटरीचा फोन 20 हजार रुपयांहून कमी किंमतीत! आज पहिला सेल

Last Updated:
तुम्हाला भारी बॅटरीचा नवा फोन खरेदी करायचा असेल तर ही जबरदस्त संधी आहे. iQOO Z11x 5G चा पहिला सेल भारतात सुरू झालाय. या फोनवर बँक ऑफर्सही असल्याने तो अगदी कमी किंमतीत तुम्ही खरेदी करू शकता.
advertisement
1/7
iQOOचा भारी बॅटरीचा फोन 20 हजार रुपयांहून कमी किंमतीत! आज पहिला सेल
iQOO Z11x 5G हा फोन आता भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या फोनचा सेल दुपारी 12 वाजेपासून अॅमेझॉनवर सुरू झालाय. कंपनीने हा स्मार्टफोन मिड-रेंज किंमतीत फोन शोधणाऱ्यांसाठी लॉन्च केलाय. यामध्ये चांगला परफॉर्मेंस, मोठी बॅटरी आणि गेमिंग फीचर्सही मिळतात.
advertisement
2/7
iQOO Z11x हा फोन तीन व्हेरिएटंमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याचा बेस मॉडल 6GB RAM आणि 128GB स्टोरेजसह येतो. या फोनची किंमत 18,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
advertisement
3/7
बँक ऑफरनंतर या फोनवर 1,500 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळत आहे. ज्यामुळे या फोनची किंमत 17,499 रुपये होते. तसंच 8GB RAM आणि 128GB स्टोरेजच्या या व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपये आहे. मात्र 2 हजार रुपये बँक डिस्काउंटनंतर हा फोन तुम्ही 18,999 रुपयांत खरेदी करु शकता. यासोबतच 8GB RAM आणि 256GB स्टोरेजच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे. जो ऑफरनंतर 20,999 रुपयांत उपलब्ध आहे.
advertisement
4/7
फोनची सर्व फीचर्स कशी आहेत? : फोनच्या डिस्प्लेविषयी चर्चा करूया. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.76-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे. या फोनचा पीक ब्राइटनेस 1200 निट्सपर्यंत जातो आणि त्यात TÜV राइनलँड लो ब्लू लाइट सर्टिफिकेशनही आहे, जे दीर्घकाळ वापरताना डोळ्यांचा ताण कमी करते.
advertisement
5/7
परफॉर्मेंससाठी फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7400 टर्बो चिपसेट देण्यात आलाय. हा फोन 4nm वर बेस्ड आहे. हा फोन प्रोसेसर गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी दमदार मानला जातो. कंपनीने सांगितल्यानुसार हा फोन AnTuTu बेंचमार्कमध्ये 10 लाकांहून जास्त स्कोअर मिळवतो.
advertisement
6/7
फोनमध्ये मिळते दमदार कॅमेरासह बॅटरी : या फोनमध्ये 50MP चा Sony IMX852 प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर दिलाय. तसंच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.
advertisement
7/7
या स्मार्टफोनची खासियत म्हणजे, याची 7200mAh ची मोठी बॅटरी आहे. यासोबतच 44W FlashCharge सपोर्ट दिला आहे. ज्यामुळे फोन जवळपास 43 मिनिटांत 1% ते 50% पर्यंत चार्च होऊ शकतो. एकूणच लगभग 43 मिनट में 1% से 50% तक चार्ज हो सकता है. कुल मिलाकर, iQOO Z11x 5G मिड-रेंज सेगमेंटमध्ये एक दमदार ऑप्शन ठरतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
iQOOचा भारी बॅटरीचा फोन 20 हजार रुपयांहून कमी किंमतीत! आज पहिला सेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल