Snake in Dream: स्वप्नात साप म्हणजे धनलाभ? आठवड्यातील या दिवशी दिसणारे नशीबवान, छप्परफाड पैसा-गुडन्यूज
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Snake Dream Astrology: फक्त साप म्हटलं तरी अनेकांची गाळण उडते. पण याच सापाला हिंदू धर्मात पूजनीयही मानलं जातं, नागपंचमीसारख्या विशेष दिवशी त्याची शेतकऱ्यांचा मित्र म्हणून पूजा केली जाते. महादेवाच्या गळ्यात साप असल्यानं तो भक्तीचेही प्रतिक आहे. काही लोकांना जाईल तिथं साप दिसतात. सापांचा संबंध ज्योतिषशास्त्रात विविध प्रकारे सांगितला जातो. हिंदू धर्मात सापांना महत्त्वाचे स्थान असल्याचे स्पष्ट होते.
advertisement
1/7

काही लोकांना स्वप्नात बऱ्याचदा साप दिसतात. काही लोक स्वप्नात साप पाहणे शुभ मानतात तर काही अशुभ मानतात. परंतु स्वप्न शास्त्रानुसार सापांची स्वप्ने अनेकदा शुभ संकेत देतात. जाणून घेऊया स्वप्नात साप दिसणे खूप शुभ मानले जाते.
advertisement
2/7
स्वप्न शास्त्रानुसार सोमवारी स्वप्नात साप दिसणे खूप शुभ मानले जाते. सोमवार हा महादेवाला समर्पित आहे, शिव-शंकर स्वतः आपल्या गळ्यात नाग वासुकी धारण करतो. सोमवारी स्वप्नात साप दिसला तर यापेक्षा चांगले काय असू शकते. सोमवारी स्वप्नात साप दिसणे म्हणजे तुमचा काळ लवकरच बदलणार असून तुमचे सर्व त्रास संपणार आहेत. स्वप्नात साप दिसणं म्हणजे अडकलेले पैसे परत मिळण्याचे देखील संकेत असतात. याशिवाय, ती बाब आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक मानतात.
advertisement
3/7
पांढरा साप पाहणे - स्वप्नात पांढरा साप पाहणे दुर्मिळ आणि शुभ मानले जाते. असं स्वप्न आनंद, शांती आणि सौभाग्य यांचे प्रतीक आहे. असं स्वप्न पडण्याचा अर्थ असा की, तुम्हाला गुप्त पैसा मिळणार आहे किंवा तुमच्या काही मोठ्या इच्छा पूर्ण होणार आहेत.
advertisement
4/7
शिवलिंगावर साप दिसणे - कोणाला स्वप्नात शिवलिंगाभोवती साप लपेटलेला दिसला तर हे स्वप्न प्रत्यक्षात महादेवाच्या कृपेचे लक्षण आहे. असं स्वप्न पाहण्याचा अर्थ म्हणजे, तुमचे प्रलंबित काम पूर्ण होईल आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठे यश मिळेल.
advertisement
5/7
साप वर चढताना दिसणे - जर तुम्हाला स्वप्नात एखादा साप झाडावर किंवा भिंतीवर चढताना दिसला तर याचा अर्थ तुमची प्रगती होणार आहे. तुम्हाला तुमच्या नोकरीत बढती मिळू शकते किंवा तुमच्या व्यवसायात अचानक मोठा फायदा होऊ शकतो. एकूणच, हे स्वप्न वाढ दर्शवते.
advertisement
6/7
फणा काढलेला साप दिसणे - स्वप्नात फणा उंचावलेला साप दिसला तर ते राजयोग किंवा धनप्राप्तीचे लक्षण आहे. भविष्यात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
बिळात साप - स्वप्नात साप बिळात जात असल्याचे दिसणे म्हणजे तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. वाईट वेळ आता संपल्याचे ते सूचक समजू शकता.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Snake in Dream: स्वप्नात साप म्हणजे धनलाभ? आठवड्यातील या दिवशी दिसणारे नशीबवान, छप्परफाड पैसा-गुडन्यूज