TRENDING:

Iron Deficiency : थकवा येतोय, सुस्त वाटतंय ? लोहाची कमतरता असू शकते कारण, जाणून घेऊया लोहाचं महत्त्व

Last Updated:

शरीराला ऑक्सिजन पुरवण्यात लोहाची भूमिका महत्त्वाची असते. लोह कमी असेल तर रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे थकवा, आळस, चक्कर येणं आणि अशक्तपणा यासारख्या तक्रारी वाढतात. विशेषतः महिला, मुलं आणि तरुणांना या समस्येचा जास्त त्रास होतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : काहीजणांना दिवसभर थकवा आणि सुस्तपणा जाणवतो. काम करताना ताकद अपुरी वाटते. अशक्तपणा जाणवतो, याचं प्रमुख कारण म्हणजे लोहाची कमतरता.
News18
News18
advertisement

National Health Mission म्हणजेच, राष्ट्रीय आरोग्य अभियानानुसार, योग्य आहारासह पुरेसं लोह असेल तर दिवसभर ताजंतवानं वाटतं. कारण शरीर निरोगी ठेवायची असेल तर योग्य पोषण आवश्यक आहे.

शरीराला ऑक्सिजन पुरवण्यात लोहाची भूमिका महत्त्वाची असते. लोह कमी असेल तर रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे थकवा, आळस, चक्कर येणं आणि अशक्तपणा यासारख्या तक्रारी वाढतात. विशेषतः महिला, मुलं आणि तरुणांना या समस्येचा जास्त त्रास होतो.

advertisement

Protein Paratha : स्वस्थ खा, मस्त राहा, प्रोटिन पराठ्यानं राहा तंदुरुस्त, नाश्त्यासाठीचा स्वादिष्ट पर्याय

खूप थकवा येत असेल तर दैनंदिन आहारात काही सोपे बदल करून लोहाच्या कमतरतेवर मात करू शकता. यासाठी गूळ, तीळ, हिरव्या पालेभाज्या, हरभरा, काळी मसूर, शेंगदाण्यांचा समावेश करा.

लोहाची पातळी लवकर वाढवण्यासाठी दैनंदिन आहारात काही पदार्थांचा समावेश करुन पाहा. या बदलांमुळे, रक्त शुद्ध होतं आणि ऊर्जा टिकून राहते.

advertisement

लिंबू, संत्री आणि आवळा यांसारख्या व्हिटॅमिन सी असलेल्या फळांसह लोहयुक्त पदार्थ खा असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. कारण व्हिटॅमिन सी मुळे लोह शोषण्यास मदत होते. योग्य आहार घेतल्यानं तुम्ही दिवसभर सक्रिय आणि निरोगी राहू शकता.

गूळ हा लोहाचा एक चांगला आणि स्वस्त स्रोत आहे. दररोज गुळाचा एक छोटासा तुकडा खाल्ल्यानं लोहाचं चांगलं प्रमाण मिळतं. गूळ चणे किंवा शेंगदाण्यांसोबत खाल्ल्यानं त्याचे फायदे आणखी वाढतात.

advertisement

Vitamin D : भरपूर सूर्यप्रकाश आहे, पण 70% भारतीयांमधे 'व्हिटॅमिन डी' का अपुरं, उन्हात जाण्याची योग्य वेळ कोणती ?

काळे चणे, मसूर, उडीद आणि राजमा यामधे भरपूर प्रमाणात लोह असतं, याचा आहारात नियमित समावेश करा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात करा लखनऊ कॉटन कुर्ती व्यवसाय, 650 ला करा दादरमध्ये खरेदी, अशी संधी पुन्हा नाही
सर्व पहा

पालक, मेथी, मोहरीच्या सालाची भाजी आणि चाकवत यासारख्या भाज्यांमधेही लोह भरपूर प्रमाणात असतं.  शेंगदाणेही लोहाचा एक चांगला स्रोत आहेत. दररोज भाजलेले शेंगदाणे किंवा शेंगदाण्याची चटणी थोड्या प्रमाणात खा. तीळांतही लोहाचं प्रमाण चांगलं असतं. चटणी, लाडू किंवा सॅलडमधे मिसळून खाल्ल्यानं ऊर्जा मिळते.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Iron Deficiency : थकवा येतोय, सुस्त वाटतंय ? लोहाची कमतरता असू शकते कारण, जाणून घेऊया लोहाचं महत्त्व
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल